जळगाव (प्रतिनिधी) साडूसोब तप्लॉट पाहून माघारी निघालेल्या दुचाकीस्वाराला जळगावकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महेश सुरेश पाटील (वय ४७, रा. द्वारका नगर, स्वामी समर्थ कॉलनी) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील द्वारकानगर जवळ घडली.
शहरातील द्वारका नगरातील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये महेश सुरेश पाटील (वय ४०, रा. द्वारकानगर, स्वामी समर्थ कॉलनी) हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शहरातील एका कंपनी नोकरी करुन कटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांच्या घराजवळ त्यांचे साडू गणेश पाटील हे भाडेतत्वावर राहत होते. दरम्यान, साडूला नवीन घर घ्यायचे असल्याने ते मंगळवारी दुपारी बिबा नगराजवळील पटेल नगरात घर पाहण्यासाठी गेले होते. त्यांना घर पसंत पडल्याने त्यांनी साडू महेश पाटील यांना बोलावून घेतले. घर पाहिल्यानंतर महेश पाटील व त्यांचे साडू गणेश पाटील हे दोघ वेगवेगळ्या दुचाकीवरुन द्वारका नगरात जाण्यासाठी निघाले.
महेश पाटील हे आपल्या (एम.एच.१९, डी. जे. १४०५) क्रमांकाच्या दुचाकीवर महामार्गावरुन द्वारकानगरकडे वळण घेत असतांना जळगावकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (एम. एच. ४०, एन. ९८३८) क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. बसच्या जोरदार धडकेत दुर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, महामर्गावरुन महेश पाटील यांचे साडू गणेश पाटील हे येत असतांना त्यांना साडूचा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी लागलीच नागरिकांच्या मदतीनेत्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.
“स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने ते त्यांच्या साडूसोबत प्लॉट पहायला गेले होते. मात्र घरी परतत असतानाच त्यांचा अपघातात मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुषावर काळाने झडप घालून हिरावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ११ वर्षाचा मुलगा व १४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन दुचाकीस्वार महेश पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला बस चालक अयुब शेख चांद पिंजारी (रा. एरंडोल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे लीलाधर महाजन हे करीत आहेत.