TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार

पत्रकारांना हेल्मेट वाटप हा स्तुत्य उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
January 6, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दर्पणदिना निमित्त आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुरेश भोळे,
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी
युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवीण सपकाळे,
सचिन गोसावी, प्रवीण पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नामदार श्री. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, आमदार श्री.सुरेश भोळे, डीआयजी श्री.दत्तात्रय कराळे , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, संपादक श्री.संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार श्री.चंद्रशेखर जोशी, श्री.सुनील पाटील, श्री.सुधाकर जाधव श्री.चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार श्री.किशोर , श्री.संजय महाजन श्री.विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे श्री.नरेंद्र पाटील,श्री. निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माध्यमात जशी बातमीसाठी स्पर्धा असते तशी स्पर्धा आमच्या क्षेत्रातही झाली आहे अशी मिश्किल टिप्पणी करून पत्रकारांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून पत्रकारांसाठी जळगाव मध्ये नवी गृहनिर्माण सोसायटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले. पत्रकार दिनानिमित्त सर्व माध्यम प्रतिनिंधीना यावेळी शुभेच्छा दिल्या.
पत्रकारांचे स्थान समाजात खुप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा असा महत्वाचा सल्ला आ. सुरेश भोळे ( राजीव मामा ) यांनी यावेळी दिला.
पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.
तर जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी होण्यापूर्वी माझ्या जीवनाची सुरुवात ही पत्रकारितेतून झाली असून आकाशवाणी मध्येही मी काम केलेले आहेत. पत्रकारितेमध्ये पहिली गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणत्या गोष्टीची बातमी करायला पाहिजे आणि कोणती बातमी करायला नको. चार जणांची बातमी वाचून बातमी करणे म्हणजे तिला इंटेलिजन्स काम केले असे म्हणत नाही तर फिल्ड पत्रकरितेवर जोर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जळगावच्या पत्रकारांचे कौतुक करताना म्हणाले की, “ मी आजपर्यंत ज्या ज्या भागात नोकरी केली त्या भागातील पत्रकारांपेक्षाही जळगावच्या पत्रकारांच्या बातमीचा वेग अधिक आहे. माझ्या टेबलवर एखाद्या फाईलवर सही झाल्या नंतर एका तासात ती बातमी बाहेर येते. हेल्मेट वाटपाचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून जळगाव मध्ये दरवर्षी 500 अपघात होऊन लोकं दगावतात त्यापैकी 400 जण दुचाकीवरचे असतात. या हेल्मेटमुळे त्यांचे प्राण वाचतील, याबाबत पोलिसांकडून जागृती केली जातेच आहे. यात पत्रकार संघाने पुढाकार घेतला असल्यामुळे या जागृतीला वेग येईल असे प्रतिपादन डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.
यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी.
शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWill help to build 'New Housing Society' for Journalists in Jalgaon

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वंजारी बु येथे शिवजयंती निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम संपन्न

February 20, 2022

चोपडा बसस्थानकात महिलेच्या पर्समधील दोन लाखांचे दागिने लांबवले !

February 15, 2023

धरणगाव येथे मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा

October 28, 2021

कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group