अमळनेर (प्रतिनिधी) यशपाल भिंगे यांच्या नामांकनाबाबत अमळनेर तालुका धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आभार व्यक्त केले.
सध्या जिकडे तिकडे विधान परिषदेसाठी आमदार कोण होणार याविषयी चर्चा सुरू आहे. तसेच चलबिचल धनगर समाजात सुद्धा दिसून येते. त्यातच डॉ यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादी कडून विधान परिषदेसाठी नामांकित केले गेले. त्याचा आनंद समस्त धनगर समाजाला झाला. त्याअनुषंगाने अमळनेर तालुका धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीने धनगर समाजाला देऊ केलेल्या आमदारकीचे समाजातील सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. डॉक्टर यशपाल भिंगे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून पट्टीचे लेखक आहेत. त्यांचे नामांकन राज्यपालांकडे दाखल झाल्यामुळे अमळनेर तालुका धनगर समाजाचे पदाधिकारी डी. ए. धनगर, वसुंधरा ताई लांडगे, दशरथ नाना लांडगे, विलास दादा लांडगे व शशिकांत आढावे यांनी आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वासर्वे मा. खा. शरद पवार यांचे मनोमन आभार व्यक्त केले. यावेळी धनगर आरक्षणा संबंधी सकारात्मक चर्चा माननीय आमदार यांच्याशी झाली. धनगर आरक्षण प्रश्नांसाठी मी प्रसंगी अधिवेशनात आवाज उठवेल अशी ग्वाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली व आगामी काळात धनगर समाजासाठी मला शक्य आहे ते सर्व करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेल असा शब्द आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिला.
















