भोपाल (वृत्तसंस्था) माझ्याकडे १५ महिन्यांच्या हिशोब मागणाऱ्या भाजपाला २०१८ मध्ये १५ वर्षाचा हिशोब देता आला नव्हता. म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले होते. आम्ही ‘व्होट’ने सरकार बनविले होते ‘नोट’ने नाही, असा जोरदार टोला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजप आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना लगावला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांनी सत्तेत असलेल्या १५ महिन्यात मध्यप्रदेशसाठी काय केले? असा प्रश्न विचारला होता. ज्याला प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीकेची तोफ डागली आहे. माझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्या भाजपाने आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आमचे व्होट सरकार होते नोट सरकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुझे समझ नहीं आता कि भाजपा और शिवराज को कैसे ये हिम्मत होती है कि मुझसे 15 महीनों का हिसाब मांगें। ये 15 सालों का हिसाब किताब दें! 2018 में नहीं दे पाए थे, तब म.प्र. की जनता ने इन्हें घर बिठाया था। हमने वोट से सरकार बनाई थी नोट से नहीं : म.प्र. के पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ pic.twitter.com/SvWu4dAFSG
— ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2020