जळगाव (प्रतिनिधी) गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कोयता आणि गुप्ती सारखा घातक शस्त्रसाठा आज बळीराम पेठेतून जप्त करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बळीराम पेठ भागात राहणारा विलास मुधकर लोट (वय-४०) यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी आज सायंकाळी विलास लोटच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांना गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कोयता, आणि दोन गुप्त्या असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ आरोपी विलास लोटला अटक केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जगदीश निकम करीत आहे. दरम्यान, एवढे घातक शस्त्र आरोपीने का गोळा केले होते? याबाबत पोलीस कसून चौकशी करता आहेत.