मुंबई (वृत्तसंस्था) गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता आता कोर्टात आहे. श्रीमंत मराठे सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत. त्यामुळे माझे गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवे. त्यांनी असे केले तर त्यांना आरक्षण मिळेन अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल. राज्यात २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. त्यांचे एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध असून ते नात्यागोत्याचे राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. pic.twitter.com/cPqRise2q7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 13, 2020