नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,१३२ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर १,१३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१,१८,२५४ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५१,१८,२५४ वर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी देशात तब्बल ११ लाख ३६ हजार ६१३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.