TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पोलिसांसोबत वाद घालणारी ‘झोमॅटो गर्ल’ एक वर्षापासून तुरुंगातच !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील वाशीमध्ये ८ ऑगस्ट २०१९ रोजी नो पार्किंगचा दंड आकारण्यावरून पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर एक वर्षापासून झोमॅटोची डिलिव्हरी गर्ल प्रियांका मोगरे ही कारागृहातच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

याबाबत ‘द वायर’ने वृत्त प्रकशित केले आहे. नवी मुंबईतील वाशीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ‘ झोमॅटो साठी काम करणारी प्रियांका मोगरे पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत होती. त्यानंतर हा व्हिडीओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचला. तिच्यावर भादवि. कलम ३५३, ३९३, २९४, ५०४, ५०६ अंतर्गत वाशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिला पोलिसांनी तिला अटक केली होती. ‘द वायर’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, प्रियांकाने रागाच्या भरात पोलिसांना शिवीगाळ केली. परंतू एका छोट्या गुन्ह्यासाठी तिला वर्षभर तुरुंगात राहावे लागले. अगोदर पोलिस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. तिला जामीन मिळण्यासाठीचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. नंतर तिला सप्टेंबर २०१९ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. मात्र तिच्या जामीनासाठी २ व्यक्तीही पुढे आल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत प्रियांका भायखळा येथील तुरुंगात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘प्रयास’ ही संस्था प्रियांकाच्या मदतीसाठी पुढे आली. त्यांनी तिच्यावतीने न्यायालयात अर्ज करून तिला वैयक्तिक हमीवर सोडण्याची विनंती केली, पण तो अर्ज फेटाळण्यात आला. अंडर ट्रायल कैद्यांसाठी ‘प्रयास’ ही संस्था मदत देण्याचे काम करते. ‘प्रयास’च्या कार्यकर्त्या रमा काळे यांनी प्रियांका बाहेर यावी यासाठी प्रयत्न सुरू केले. तिचे नातेवाईक शोधणे, त्यांना मदतीसाठी आवाहन करणे, असे काम त्यांनी सुरू केले. पण मध्येच कोरोनाची साथ आली आणि सगळ्याच गोष्टी बंद झाल्या.

दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी प्रियंका प्रकरणाची फाईलच न्यायालयात पाठवली नाही. वाशी येथील न्यायालय ते ठाण्याचे सत्र न्यायालय अशा अनेक चकरा रमा काळे यांना माराव्या लागल्या. आता पुन्हा रमा काळे यांनी प्रयत्न सुरू केले. ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंगराव मोरे यांनी जामिनाचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात करण्यासाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला आणि या सप्टेंबर महिन्यात २१ तारखेला न्यायालयाने अर्ज मंजूर केला. २५ हजार रु. रोख रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर प्रियांकाला जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रियांकाला एक महिन्याच्या आत दोन जामीनदार मिळवावे लागणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

'भारतरत्न' लता दीदींचा आज ९१ वा वाढदिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार !

December 14, 2022

शहिद यश देशमुख यांच्या परिवाराचा ‘इंडियन आयडॉल’ नँशनल शोमध्ये होणार सन्मान !

August 6, 2021

महात्मा गांधी उद्यानाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ; स्व. सलीम पटेल यांची स्वप्नपूर्ती !

December 4, 2022

सर्वेक्षण : लोकसभा निवडणूक आज झाली तर भाजपला मोठा धक्का ; महाराष्ट्रात मिळणार अवघ्या ‘इतक्या’ जागा !

August 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group