अहमदनगर (वृत्तसंस्था) गेल्या एक वर्षांपासून पत्नी वेगळी राहत असल्याचा बदला घेण्यासाठी एकाने तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, अकोले तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी एका बावीस वर्षीय तरुणाचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतू गेल्या एक वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नव्हती. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने दुसऱ्याच्या नावाने मिळवले सिमकार्ड वापरून ग्रुप तयार केला. तसेच त्यामध्ये त्याच्या पत्नीला ऍड केले. त्यानंतर ग्रुपवर त्याच्या पत्नीचा चेहरा असलेला फोटो व खाली नग्नावस्थेतील फोटो एडिट करून लावला. तसेच तसाच अन्य एक फोटो अश्लील फोटो फिर्यादी महिलेला पाठविला. एवढेच नव्हे तर हे फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.