TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील संचारबंदी एक दिवसाने वाढवली ; प्रांताधिकाऱ्यांचे नवीन आदेश !

जाणून घ्या नवीन आदेशात नेमकं काय म्हटलंय !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in Uncategorized, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात प्रांताधिकारींनी लावलेली संचारबंदी एक दिवसाने वाढवली आहे. त्यामुळे आज सकाळी 8 वाजेपासून तर शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढले.

शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रण नुकतेच मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. त्यानंतर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार होते.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

नेमका काय आहे विषय

गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम १४४ लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी घेतली सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसासाठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली होती.

शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त कायम !

शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

जाणून घ्या…नेमकं काय म्हटलंय आदेशात

विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग एरंडोल, यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02/11/2022 चे रात्री 08.00 वाजेपासुन दिनांक 04/11/2022 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केले होते. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यास संचारबंदीमुळे मोठी मदत झाली त्यामुळे संचारबंदी एक दिवसांनी वाढवून द्यावी असा अहवाल धरणगाव पोलीस निरीक्षकांनी दिला होता त्यानुसार शनिवार सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. सदर आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगाव शहरातून जानारे मुख्य रस्त्यावरुन वाहतुक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही.

गावासह सोशल मीडियातही आवाहन

प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे. तसेच एक ऑडीओ क्लिप देखील टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ईशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गावात संचारबंदी वाढविण्यात आल्याबाबत दवंडी देखील देण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमधून महिला प्रवाशाचे दागिने केले लंपास !

May 8, 2023

शिंदे गटाच्या धरणगाव शहर प्रमुखपदी विलास महाजन व युवा सेना उपजिल्हा प्रमुखपदी भैया महाजन !

January 3, 2023

जळगावात बंद घर फोडले ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

August 16, 2021

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; नाव न घेता भाजपच्या ‘या’ नेत्यावर साधला निशाणा !

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group