रावेर (प्रतिनिधी) शहरातील गांधी मार्केटमधील किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने १५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री दुकान फोडून साडेसात हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (वय-२४, रा. नवीन निंबोल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
१५ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री शहरातील मानकर प्लॉट परीसरात राहणारे अशोक ग्यानचंद मुलचंदानी (वय-६०) यांचे महात्मा गांधी मार्केटमधील सुरज किराणा नावाचे बंद दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडत ७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत महेंद्र उर्फ गोंड्या ज्ञानेश्वर कोळी (वय-२४ रा. नवीन निंबोल ता. रावेर) याला पोलीसांनी अटक केली. ही कारवाई विभागीय पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे, पो. कॉ. तुषार मोरे, पो.कॉ. मनोज म्हस्के, पो.कॉ.भरत सोपे यांनी कारवाई केली. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. सतिष सानप हे करीत आहे