धरणगाव (प्रतिनिधी) शहर युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी शेतकरी विरोधी बिल व कामगार विरोधी धोरणा विरुद्ध मशाल आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी मोदी सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगरध्यक्ष निलेश चौधरी,काँग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल चौधरी, दीपक जाधव, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरव चव्हाण, गौरंग पटेल, सुनील बडगुजर, गोपाल पाटील, प्रमोद जगताप, उपाध्यक्ष राहुल पवार, भूषण भागवत, सचिन चव्हाण,राजेंद्र महाजन, ललित मराठे, राकेश पाटील ,सागर बाचपाई, मुकेश चव्हाण, साहिल शेख, इरफान शेख, शोएब शेख दीप चव्हाण, जिग्नेश बायस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.