TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – वीज ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ, पारदर्शक आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक उपविभागात आयोजित ग्राहक समाधान शिबिरांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष शिबिरांमध्ये वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचे जागेवरच समाधान करण्यात आले. २८१ तक्रारींचे निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला.

मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मंडलांतर्गत एकूण ३० उपविभागांमध्ये एकाच दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वीज ग्राहकांच्या समस्या त्यांच्याच कार्यक्षेत्रात जलदगतीने सुटाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये प्रामुख्याने नवीन वीजजोडणी, वीजबिलांमधील नावात व पत्त्यात बदल, सरासरी व वाढीव वीजबिले, रुफ टॉप सौर योजना तसेच आधुनिक स्मार्ट मीटरशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सर्व संबंधित तांत्रिक कर्मचारी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते.        विशेष म्हणजे प्राप्त तक्रारींवर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. यात जळगाव विभागातील ४५, चाळीसगाव विभागातील  ९४, पाचोरा विभागातील ३, धरणगावविभागातील ४७, मुक्ताईनगर विभागातील ४३, सावदा विभागातील ३८ व भुसावळ विभागातील ५६ तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतच्या शंकांचे सविस्तर निरसन केले. अचूक मीटर रीडिंग, दिवसा वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट ८५ पैसे सवलत, ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होणारी रिअल टाईम वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची अचूक माहिती यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्मार्ट मीटर अत्यंत पारदर्शक व फायदेशीर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्मार्ट मीटर बाबत त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना स्मार्ट मीटर व साधे मीटर या दोघांची कार्यपद्धतीतील फरक व दोन्ही मीटर सारखेच रीडिंग रेकॉर्ड करतात हे समजावून सांगण्यात आले. उपस्थित ग्राहकांनी त्यांच्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्य शासनाच्या स्मार्ट सोलर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच १०० युनिटखालील वीजवापर असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील व सर्वसाधारण वर्गवारीतील ग्राहकांना अल्प दरात १ किलोवॅट सौर ऊर्जा संच मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे ग्राहकांना वीज बिलात होणारी बचत आणि अनुदानाबत मार्गदर्शन करण्यात आले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देऊन ती सोडवली जाईल, अशी ग्वाही महावितरणने उपस्थित ग्राहकांना दिली. हे ग्राहक समाधान शिबिर आता दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जळगाव मंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांत आयोजित केले जाणार असून, ग्राहकांना आपल्या तक्रारी व समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील, असे महावितरणने कळवले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon281 consumers find ‘resolution’ at Mahavitaran camps

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल !

October 26, 2023

खुन्नसने का पाहतो म्हणत तरुणाचा केला खून ; पाचोरा येथील घटना

February 19, 2025

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दिलीप माळी यांची हरकत !

May 14, 2022

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात पारंपरिक पद्धतीने वसुबारस साजरी

November 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group