TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्तीचा सत्कार स्वीकारला अन् पुढे घडलं अघटीत ; पाचोऱ्याजवळ गँगमनचा रेल्वे अपघातात मृत्यू !

सेवानिवृत्तीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन ; कुटुंबीय घरी वाट बघत असतानाच आली दु:खद वार्ता !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीच्याच दिवशी रेल्वेखाली सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा रेल्वे स्थानक परिसरात घडली. पाचोरा येथील गँगमन सुरेश सोनवणे हे दि. ३१ रोजी सेवानिवृत्त होणार होते. कार्यालयातील सत्कार स्वीकारून ते भुसावळ कार्यालयात सत्कार कार्यक्रमास जात होते. परंतू काशी एक्स्प्रेसच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी भुसावळ जातांना घडली घटना !
पाचोरा रेल्वे स्टेशन येथे गँगमन म्हणून युनिट नंबर ४ चे सुपरवायझर असलेले सुरेश मोहन सोनवणे (वय ६० वर्षे रा. जामनेर) हे आज दुपारी १२:४५ वाजता काशी एक्स्प्रेसच्या खाली आल्याने अपघाती निधन झाले. पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ त्यांचा मृतदेह आढळला. सुरेश सोनवणे यांनी गँगमन म्हणून ३२ वर्षे रेल्वेत सेवा दिली होती. ते दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी ते भुसावळ येथे जाणार होते. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

READ ALSO

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

घरी सेवानिवृत्तीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे होते आयोजन !
सुरेश सोनवणे यांच्या जामनेर येथील घरी सेवानिवृत्तीनिमित्त नातेवाईकांच्या समक्ष मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वागत समारंभाची तयारी झाली होती; मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मृत्यूचीच बातमी नातेवाईकांना कळल्याने एकच शोककळा पसरली. सुरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सिद्धार्थ व एक मुलगी विवाहित असून रेल्वे प्रशासनातर्फे त्यांना २५ हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. तसेच अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील एकाला नोकरी देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे रेल्वे तर्फे सांगण्यात आले. सेवानिवृत्तीच्याच दिवशी सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्काराची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

Jalgaon News : पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; नदी पात्रात फिट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“आमच्या देवावर हात उचलण्याची भाषा युवासैनिक सहन करणार नाही” : वरुण सरदेसाई

August 24, 2021

पैसा,संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य : खासदार उन्मेष पाटील !

May 6, 2023

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group