TheClearNews.Com
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजित पवारांचा ६ कोटींचा सोशल मिडिया एजन्सी नेमणुकीचा निर्णय मागे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी सोशल मिडिया एजन्सी नेमण्याचा निर्णय टीकेची झोड उडाल्यानंतर अखेर मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी ६ कोटी रूपये मोजून स्वतंत्र सोशल मिडिया एजन्सीसाठीचा निर्णय घेण्यात आला होता. पण विरोधकांपासून ते सर्वसामान्यांकडून या निर्णयाविरोधात टीकेचा सूर निघाल्यानंतर अखेर अजित पवारांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली इमेज सुधारवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय स्तरावरील समाज माध्यमांचा कामासाठी बाहेर संस्थेची निवड करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. युट्युब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमातून चांगली प्रतिमा तयार होण्यासाठी वर्षाला तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज महाराष्ट्र शासनाच्यावतीने मंजूर सुद्धा करण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून टीका होत असल्यामुळे अजित पवारांनी निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे.

READ ALSO

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देशच अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय बुधवारी जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

विरोधकांकडून टीका

कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी ६ कोटी रुपये खर्च करायला निघालं आहे, अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
Next Post

शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन केले जातात : नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणेपर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार : आमदार मंगेश चव्हाण !

October 2, 2024

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा ; कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर !

November 10, 2023

High Odds In Sports Betting At 1 Win Uz

November 19, 2022

आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याला धमकी देत वाहन पळवले

March 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group