TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, शहाबाज देशपांडे : अल-फलाह फाउंडेशनतर्फे आयोजित शैक्षणिक प्रोत्साहन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअरच्या विविध संधी तसेच भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमात नीट परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी, विविध शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच एम.कॉम. आणि एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीसोबतच पालक, शिक्षक आणि समाजाच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पाळधी परिसरातील उत्कृष्ट शिक्षकांचाही शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या कार्याचा गौरव केल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास श्री. प्रतापराव गुलाबरावजी पाटील, डॉ. परवेज देशपांडे सर, डॉ. अब्दुल्लाह सर, सईद सर आणि मुश्ताक करीमी सर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शरीफ पटेल सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फैज पटेल सर यांनी केले.

अल-फलाह फाउंडेशनच्या ‘अल-फलाह स्टार टीम’मध्ये अध्यक्ष नेहाल मन्यार, उपाध्यक्ष आसिफ शेख, सचिव साबीर देशपांडे, उपसचिव वकार अहमद शेख आणि कोषाध्यक्ष समीर पिंजारी यांचा समावेश आहे. तसेच रईस मन्यार, वसीम शेख, शहबाज मन्यार, तौसीफ देशपांडे, शकील शेख आणि तनवीर मन्यार यांनी सदस्य म्हणून कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे म्हणजे केवळ त्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करणे नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे आणि इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे होय. अभ्यासातील यशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आचार-विचार, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सन्मान केल्याने ‘आपणही असेच यश मिळवायचे’ ही प्रेरणा इतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते.

सत्कार सोहळे हे केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या यशाला समाजाकडून मिळणारी कौतुकाची पावती आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारे माध्यम ठरतात. त्यामुळे शाळा आणि समाजाच्या पातळीवर अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व सन्माननीय अतिथी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांचे अल-फलाह फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.

‘आमचा उद्देश केवळ सन्मान करणे नाही, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा, योग्य मार्गदर्शन आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास देणे हा आहे. आजचे प्रोत्साहन हेच उद्याच्या यशाचा पाया आहे,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: paldhi

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

January 19, 2026

जळगावच्या रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे !

August 11, 2022

महापालिकेतील अधिकारी दिगेश तायडेची सीआयडीमार्फत चौकशी करून नगररचना विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा

December 21, 2024

अवजड वाहनाची ट्रॅव्हल्सला धडक ; एक ठार

July 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group