TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतर्नाद प्रतिष्ठान, शिक्षण विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतूने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विध्यार्थ्यासाठी आणि खुल्या गटात इच्छुक व्यक्तीसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.

सध्याचा कोरोना काळ लक्षात घेता सदर स्पर्धा ही ऑनलाईन घेण्यात येत आहे. इच्छुक सहभागींनी आपला वकृत्वाचा व्हिडिओ तयार करून तो यु ट्युबला डाउनलोड करून त्याची लिंक अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या व्हाटस अप ला टाकावयाची आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन होणार आहे आणि अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी होणार आहे. वकृत्व स्पर्धा ४ गटात होणार आहे. प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शिव चरित्र पुस्तक, प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे. पहिला गट ३ री ते ५ वी साठी आहे. शिवराज्याभिषेक, जिजाऊंचा शिवबा, मी बाल शिवाजी बोलतोय असे विषय असतील. वेळ ३ मिनिट आहे. दुसरा गट ६ वी ते ८ वीचा आहे. शिवरायांची युद्धनीत, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गड किल्ले असे विषय असतील. वेळ ४ मिनिट आहे.

READ ALSO

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

स्पर्धकांचा तिसरा गट ९ वी ते १२ वीचा आहे. महिलांचा आदर करणारे शिवराय, शिवरायांचे जलव्यवस्थापन, बहुजननायक छत्रपती शिवाजी असे विषय असतील. वेळ ५ मिनिट आहे. पहिल्यांदाच खुल्या गटासाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा होणार आहे. चौथा गट हा खुला असणार आहे. यात कुणीही भाग घेउ शकणार आहे. यात वयाची किवा व्यवसायाची कुठलीही अट नसणार आहे. शिवरायांचे धर्मनिरपेक्ष धोरण, छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी धोरण व आजचा शेतकरी असे विषय असतील. वेळ ७ मिनिट असणार आहे. बुधवारी नियोजनाची बैठक घेण्यात आली. अंतर्नादचे आणि शिक्षण विभागाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, सुनिल वानखेडे, श्रीकांत जोशी, नाना पाटील, आनंद सपकाळे, समाधान जाधव, अमित चौधरी, प्रा.पंकज पाटील, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, प्रा.श्याम दुसाने, वंदना भिरुड, प्रा.भाग्यश्री भंगाळे, भूषण झोपे, रोहिदास सोनवणे, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, जीवन सपकाळे, हरीश भट, सचिन पाटील, प्रमोद पाटील, संदिप सपकाळे, मंगेश भावे हे आहेत. जास्तीत जास्त विध्यार्थी आणि इतर इच्छुकानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख संजय भटकर, प्रकल्प समन्वयक देव सरकटे, सह समन्वयक राजू वारके, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
Next Post

आ. भोळे बनावट लेटरहेड प्रकरण : खडसेंच्या वेळी तक्रार...झंवरच्या वेळी माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहमंत्र्यांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा नाही : खडसे

October 17, 2020

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

June 28, 2023

धरणगाव येथे रोशनी जगताप हिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

January 13, 2021

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ; पनवेलच्या फार्महाउवर घडली घटना !

December 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group