TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. भोळे बनावट लेटरहेड प्रकरण : खडसेंच्या वेळी तक्रार…झंवरच्या वेळी माघार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना आपण पत्र पाठविले नाही. कुणीतरी बनावट लेटरहेड तयार केल्याचे सांगत आ. भोळे यांनी २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. परंतू बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झंवरच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये सापडलेले लेटरहेड बनावट असून ते आपले नसल्यामुळे तक्रार देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी वेगळी भूमिका यावेळी आ. भोळे यांनी घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सलग दुसऱ्यांदा आ. भोळे यांचे कथित बनावट लेटरहेड संवेदनशील प्रकरणात वापरले गेल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

काय आहे प्रकरण

READ ALSO

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झंवरच्या कार्यालयात सापडलेले आ. भोळे यांचे कोरे लेटरहेड सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. धक्कादायक आमदार गिरीश महाजनांपाठोपाठ आता सुरेश भोळे यांचेही लेटरपॅड झंवरच्या कार्यालयात आढळून आल्यामुळे चर्चेला अधिक उधान आले आहे. सुरज झंवर याच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये आठ पिशव्यांमध्ये शेकडो कागदपत्र मिळाले होते. यात जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या नावाचे कोरे लेटरपॅडचा देखील समावेश आहे. याच बाबत भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी खुलासा देत म्हटले होते की, जिथे सरकारी शिक्के बनावट बनू शकतात त्या ठिकाणी आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे. तसेच बीएचआर प्रकरणाशी आ. भोळे यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आ. भोळे हे बीएचआर पतपेढीचे ठेवीदार व कर्जदार सुद्धा नाहीत. बीएचआर प्रकरणाचा आ. राजूमामा भोळे यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठण्यासारखे असल्याचेही श्री. साखरे यांनी म्हटले होते. तर सापडलेले लेटरहेड बनावट असून ते आपले नसल्यामुळे तक्रार देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका आ. भोळे यांनी घेतली आहे.

 

आ.भोळेंच्या लेटरहेडवरून खडसेंची बदनामी

 

दुसरीकडे याआधी २०१८ मध्ये देखील आमदार राजूमामा भोळे यांच्या लेटरहेडवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याचे पडसाद थेट विधिमंडळात देखील उमटले होते. माजी मंत्री एकनाथ खडसेयांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा बेहिशेबी मालमत्ता आहे, त्याशिवाय कन्या रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन असलेल्या जिल्हा बॅँकेतून खडसे यांनी कोट्यवधीच्या नोटा बदल केल्या आहेत. याची सीबीआय चौकशीही करण्यात आली आहे, अशा आशयाची तक्रार २०१८ मध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे करण्यात आली होती. आपली बदनामी करण्याच्या हेतूने कोणीतरी हा प्रकार केल्याचे आमदार भोळे यांनी स्पष्ट केले होते. तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तक्रारीत, आमदार भोळे यांच्या लेटरहेडसारखे बनावट लेटरहेड बनवून त्यात खडसे यांची बदनामी व्हावी म्हणून त्यांच्याकडे कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे जिल्हा बँकेत चेअरमन असल्याने कोट्यवधीच्या नोटा बदल केल्याचे म्हटले आहे. हीच तक्रार बनावट लेटरपॅडवर उच्च न्यायालयच्या न्यायधिशाकडेही पाठविण्यात आली आहे. एकंदरीत आमदार भोळे व आमदार खडसे यांच्यात दुरावा होण्यासाठीच हा प्रकार झाल्याचेदेखील फिर्यादीत म्हटले होते.

 

काय म्हटले होते पत्रात

 

खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. ताहिलरामानी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून ती दाबण्यात आली, असेही पत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे आ.भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी त्या पत्रावर होती.

 

 

विधानसभेत पडसाद

 

याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली होती. मात्र सुरेश भोळे यांनी स्वतः तक्रार दाखल करुनही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे विधानसभेत एकनाथराव खडसे चांगलेच संतापले होते. आ.सुरेश भोळे यांनी स्वतः याविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने खडसेंनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला होता.

 

गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

आमदारांनी तक्रार केल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत हे गंभीर आहे, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. एसपीला आत्ताच्या आत्ता फोन लावा, असे आदेश अध्यक्षांनी दिले होते. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी बाहेर जाऊन जळगावच्या पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

आ.भोळे यांनी काय म्हटले होते फिर्यादीत

 

यात तक्रारीत, आमदार भोळे यांच्या लेटरहेडसारखे बनावट लेटरहेड बनवून त्यात खडसे यांची बदनामी व्हावी म्हणून त्यांच्याकडे कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे जिल्हा बँकेत चेअरमन असल्याने कोट्यवधीच्या नोटा बदल केल्याचे म्हटले होते. एकंदरीत खडसेंना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला होता. तर माझ्यात व आमदार खडसे यांच्यात दुरावा होण्यासाठीच हा प्रकार झाल्याचेदेखील फिर्यादीत आ. भोळे यांनी म्हटले होते.

 

खडसेंच्या वेळी तक्रार…झंवरच्या वेळी माघार का?

 

बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झंवरच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये सापडलेले आ. राजूमामा भोळे यांचे लेटरहेड बनावट असल्याचा दावा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी केला होता. श्री. साखरे यांचा दावा खरा असेल तर विधीमंडळ सदस्याचे बनावट लेटरहेड बनविण्या सारख्या गंभीर प्रकरणी खुलाशाऐवजी पोलिसात तक्रार का नाही?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. खडसे यांच्या प्रकरणात आ. भोळे यांनी तात्काळ तत्कालीन पोलीस अधीक्षकांची भेट घेवून तक्रार दिली होती. मग झंवरच्या प्रकरणातही लेटरहेड बनावट असल्याचे माहित असूनही ते तक्रार का देत नाहीय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा भविष्यात आपल्याला अडचणीत आणू शकतो, हे माहित असूनही तक्रार देण्यापासून आ. भोळे हे माघार का घेत आहेत?,हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, खडसे यांच्या प्रकरणात भोळे यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्र पाठवून खुलासा करावा लागलाय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
जळगाव

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
गुन्हे

घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय बहिणीचा भावाकडून विनयभंग

April 26, 2026
क्रीडा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026
Next Post

शेतकऱ्यांसाठी इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नव्हती : राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 13, 2021

गिरड येथील लखवी नाल्याच्या कामात लाखोंचा अपहार ; ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा !

February 11, 2022

भंगारवाला ते मंत्री ; असा आहे नवाब मलिकांचा प्रवास !

February 23, 2022

लग्न जुळले, साखरपुडा झाला, नंतर घडलं भलतंच ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group