TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील विविध गावांतील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी काही ग्रामपंचायतीच्या गावी सेविका व मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यासाठी स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी १८ फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्प-१ मधील टेकवाडे खुर्द, वरखेडे खुर्द, पिंपळवाड निकुंभ येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तर प्रकल्प-२ मधील लोंजे, गंगाआश्रम, एकलहरे, चांभार्डी बु., वाघडू येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका या पदासाठी व गणेशपुर येथील एक मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याचबरोबर एरंडोल तालुक्यातील वनकोठे, पातरखेडा, भालगांव, कढोली, जवखेडे सिम, उत्राण अ.ह. येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर जानफळ, कनाशी, दौलतपुरा, आडगाव तांडा येथील प्रत्येकी एक मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी १३ फेब्रुवारीपर्यत अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना रावेर-१ प्रकल्पातंर्गत मुंजलवाडी व चोरवड येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर रावेर-२ प्रकल्पांतर्गत गुलाबवाडी, सहस्त्रलिंग, बोरखेडासीम, येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी तर पाल येथील एका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जदाराचे वय दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी २१ वर्ष पूर्ण ते ३० वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास २ अपत्याचेवर अपत्य नसावीत. दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देणार नाही याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, अर्जदार महिला असावी, अर्जदार स्थानिक रहिवाशी असावी (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक पात्रता सेविकेसाठी किमान दहावी पास ते उच्चतम तर मदतनीस साठी किमान सातवी पास ते उच्चतम असावी.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

अर्ज कार्यालयाने वितरीत केलेला व विहित नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा तहसिलदार यांचा दाखला असावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त १० गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा असावा. (एस.सी/एस.टी/व्ही.जे.एन.टी/ओबीसी/एस.बी.सी), मागासवर्गीय उमेदवारास १) एससी व एसटी साठी १० गुण २) व्ही.जे.एन.टी/ ओबीसी/एस.बी.सी साठी ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. १२ वी नंतर अर्जदार पदवीधर/ङि एड/बि.एड केले असल्यास अतिरिक्त ५ गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित व खाजगी संस्थाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही, रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास तसा बदलाबाबत व भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आहे,

अर्ज विक्री व स्विकृती ५ ते १८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत असून अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. १२ फेब्रुवारी पर्यंत राहिल. शासकीय सुट्टीचे दिवशी अर्ज विक्री वा स्वीकारणे बंद राहिल, शैक्षणिक पात्रेतसंबधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले नसल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीत व त्या प्रमाणपत्रांना गुणदान करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र नंतर स्वीकारले जाणार नाही. मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान ७ वी पास असावी, अर्जासोबत इ. ७ वी चे गुणपत्रक जोडावे. तसेच पुढील शिक्षण झाले असल्यास त्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडावेत. असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, चाळीसगाव प्रकल्प नं. १ व २, रावेर प्रकल्प नं. १ व २ आणि एरंडोल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा देवस्थानाची यात्रा कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा

January 20, 2023

जळगावात खोटा प्लॉट दाखवून वरणगाव येथील महिलेची १० लाख २१ हजारात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 10, 2022

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पहिला सामना!

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group