TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

१० किमी प्रकल्पामुळे वाहतूक होणार सुरळीत

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम व सुसूत्र करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलत चाळीसगाव येथे रेल ओव्हर रेल (आरओआर) उड्डाणपुल प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सुमारे २६३.८६ कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेच्या गर्दीच्या या मार्गावरील ताण कमी होणार आहे.

सध्या चाळीसगाव परिसरात तीन मार्गावरील अनेक क्रॉसिंगमुळे रेल्वे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः धुळे बाजूकडून येणाऱ्या गाड्यांना मुख्य मार्ग ओलांडताना वारंवार विलंब सहन करावा लागतो. त्यामुळे गाड्यांचा वेग कमी होऊन संपूर्ण रेल्वे ऑपरेशनमध्ये गुंतागुंत वाढते.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

याशिवाय या विभागात चौथा मार्ग विकसित होत असल्याने भविष्यात वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातच विद्यमान व्यवस्था अपूर्ण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेला सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रेल्वे मार्गाचे विभाजन करून विविध दिशेने जाणाऱ्या गाड्यांची हालचाल स्वतंत्रपणे होईल, अशा पद्धतीने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी होणारे मार्गसंघर्ष पूर्णपणे टळून गाड्यांची हालचाल अखंड व वेगवान होणार आहे. चाळीसगाव ते जामदा दरम्यानचा मार्ग सध्या लांब ब्लॉक सेक्शनमुळे ओळखला जातो. या प्रकल्पामुळे मार्गांची पुनर्रचना होऊन गाड्यांचा प्रवाह सुरळीत होणार असून स्थानकावरील थांब्याचा वेळही कमी होणार आहे. अप दिशेला सुमारे १५ मिनिटे तर डाउन दिशेला सुमारे २० मिनिटांची बचत होण्याचा अंदाज आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ११.०१ किलोमीटर असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबत सर्वेक्षण केले आहे. प्रकल्पांतर्गत दोन नवीन स्थानक इमारती, एक मोठा पूल, १६ लहान पूल, एक रस्त्याखालचा पूल तसेच पाच मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. मार्गाची रचना १:२०० उतारानुसार असून ताशी १३० किमी वेगाने गाड्या धावण्यास तो सक्षम असेल.

भविष्यातील वाढती मागणी पूर्ततेसाठी निर्णायक ठरेल प्रकल्प सध्या विभागाची वहन क्षमता ४५.४ टक्के असून आगामी काळात ती १०७.९६ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. दरवर्षी सुमारे ०.६ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तर साखर, सिमेंट उद्योग तसेच औद्योगिक क्लस्टर्सना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. चाळीसगावातील हा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प वाहतूक सुलभ करण्यासह प्रादेशिक आर्थिक विकासाला गती देणारा ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Approval for Rs 264 crore railway flyover in ChalisgaonChalisgaon

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा खून ; संशयित अटकेत !

June 18, 2023

सोमय्यांची ती जखम खरी की खोटी? ; वैद्यकीय रिपोर्टमधून मोठा खुलासा !

April 27, 2022

जळगावात ९० च्या ‘क्वाटरवरून राडा ; परस्परविरोधी गुन्हे !

January 1, 2024

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 25 ऑक्टोंबर 2024 !

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group