TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे निषेध – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दक्षिण काश्मीर मधील कुलगाम येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस फिदा हुसैन यांच्यासोबत 3 भाजपा कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी क्रुरपणे गोळया घालुन हत्या केली. सदर घटनेचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हा तर्फे निषेध करण्यात आला असून, या हत्येस जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीश महाजन, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगाव महानगर तर्फे प्रदेश उपाध्यक्ष अॅड.शहेबाज शेख व महानगर जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी खा.उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, जि प अध्यक्षा रंजनाताई पाटील, आ.चंदू पटेल, आ.मंगेश चव्हाण, पोपट तात्या भोळे, लालचंद पाटील, अमोल शिंदे, अमोल नाना पाटील, सुनील काळे, भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, दीप्ती चिरमाडे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, महेश जोशी, डॉ.राधेश्याम चौधरी,विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, नीला चौधरी, मनोज भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या निवेदनात म्हंटले आहे की, सदर कार्यकर्त्यांची सर्रासपणे हत्या म्हणजे दहशतवादयांकडून लोकशाहीचा खून असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. जम्मू काश्मीर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येची ही पहिली घटना नसुन, दहशतवादयांनी मागिल काही महिन्यात अनेक भाजपा कार्यकर्त्यांची निर्दयीपणे हत्या केली आहे. गेल्या महिन्यातच मध्य काश्मीरमध्ये बडगाम जिल्हयात एक भाजपा कार्यकर्ता व दलवास गावात ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलर यांची गोळी घालुन हत्या करण्यात आली होती. तसेच जुलै महिन्यात
बांदीपोरामध्ये माजी जिल्हाध्यक्ष वसीम अहमद बारी त्यांचे वडील आणि भावाची सुध्दा हत्या केली होती. त्यामुळे सरकारने जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपविणे गरजेचे असून,भाजपा नेता व कार्यकर्त्यांची सुरक्षाव्यवस्था सुध्दा करणे महत्वाचे आहे.

कुलगाम येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे फिदा हुसैन, उमर रशीद बेग, उमर रमजान यांच्या हत्येचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. या हत्येची जबाबदारी स्विकारणा-या द रजिस्टेंस फ्रंट ( टी आर एफ ) नामक अतिरेकी संघटनेवर कारवाई करण्यात येवून, या घटनेतील दहशतवादयांना लवकरात लवकर अटक
करण्याची मागणी सुध्दा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे करण्यात आली आहे.

निवेदनावर अॅड.शहेबाज शेख,गुड्डू पठाण, मोहम्मद नूर शेख, सैयद शब्बीर अली,जुलफेकार पटवे, युसुफ खान, युनुस शेख, फिरोज खान यांच्या सह्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

अमळनेरात जिजाऊ महिला जिमखाना व सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न

March 29, 2022

चोपडा-अकुलखेडा रस्त्याच्या डबक्यात बसून तरुणाने केली अंघोळ !

November 29, 2023

डॉ. नितु पाटील विद्यापीठात प्रथम

September 6, 2022

जन्म दाखल्यांची पडताळणी ; दोषींवर होणार गुन्हे दाखल !

April 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group