TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : भुसावळ तालुक्यात एकाच रात्रीतून तीन निर्घृण खून !

कंडारीत जुन्या वादातून दोघा भावंडांचा तर भुसावळात मध्यरात्री कुविख्यात गुन्हेगाराचा मर्डर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु होत नाही, तोच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा देखील मर्डर झाला. एकाच रात्री एकामागून एक तब्बल तीन खून झाल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोघं भावंडांचा जुन्या वादातून खून !
कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद असून त्या वादाची ठिणगी शुक्रवारी पडल्यानंतर हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

अधिकारी घटनास्थळी दाखल !
कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

कुविख्यात गुन्हेगार निखीलची चाकू मारून हत्या !
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्‍यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

 

पोलिसावर हल्ला करून झाला होता फरार !

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले होते. संशयित आरोपीला महेंद्र ढाबा जवळ रोडवर सापळा रचून ताब्यात घेत असतांना पोकॉ.प्रशांत सोनार यांना (ता. १) सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निखिल राजपूत याने फायटरने उजव्या डोळ्या खाली मारून धक्का – बुक्की केली. तसेच हल्ला करून डिझायर गाडीतून पळून गेले. म्हणून फैजपूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निखिल राजपूत,अनिषा उर्फे मोही रितेश रतनानी सोबत तीन अनोळखी इसमांविरुध्द पोकॉ.प्रशांत सोनार (नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता .या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय लोखंडे करीत आहे.

पोलीस अधिकार्‍यांची धाव !
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
Next Post

पुण्यातील दोघांना तीन गावठी पिस्तूलासह अटक ; चोपडा पोलिसांची धाडसी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल चौधरींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच ; जामीन अर्जावरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलली

May 21, 2022

शानबाग विद्यालयाच्या खुलाशानंतर तक्रारदारानेही केले गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी म्हणणे सादर !

May 12, 2021

अनुकंपाधारकांची महापौर, आमदारांनी घेतली भेट !

February 8, 2021

अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group