TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तब्बल ४८ वर्षा नंतर स्नेह मेळावानिमित्त बालपणाच्या आठवणींना उजाळा

स्नेह मेळाव्यात ६५ वर्षांचे निवृत्त लोकांनी देखील जुन्या गाण्यावर धरला ताल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) “बालपणाचा सखा” हा कितीही मोठा झाला तरी तो “सखाच” राहतो उभ्या आयुष्यात अनेक लोक भेटत असतात परंतु लहानपणाचा मित्राची ओढ वेगळीच असते. असा आगळा वेगळा स्नेह मेळावा नुकताच चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आनंदराज पॅलेसच्या ए. सी. हॉलला पाहायला मिळाला. तब्बल ४८ वर्षा नंतर म्हणजेच १९७२-७३ मध्ये येथील प्रताप विद्या मंदिर मधील इयत्ता ११ वीचे विद्यार्थी स्नेह मेळावाच्या निमित्ताने एकत्र आले.

यातील अनेक जण तर ४८ वर्षा नंतरच एकमेकांना भेटल्याने कोणी हस्तोदोलन केले तर कोणी गळाभेट घेतली. काहींना तर एकमेकांना भेटत असतांना आनंदाश्रू देखील थांबवता आले नाही. सन ७२-७३ ची मित्रांची टिम एकत्र करणे सोपे नव्हते तरीही उषा संचेती (पुणे) सह सुंदरलाल सचदेव, भोजराज पाटील, शैला गुजराथी यांनी कसोशीने प्रयत्न करून हा स्नेह मेळावा घडवून आणला. स्नेह मेळाव्यात सर्व प्रथम कोरोनामुळे तापमान चेक करूनच हॉलला प्रवेश केला. आणि प्रत्येकाला काढाही देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करतांनाच आपले काही स्नेही दिवंगत झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर प्रत्येकाने आप आपला परिचय दिला परिचयात मागिल ४८ वर्षात आपल्या परिवारावर आलेल्या सूखद – दुःखद घटनाचा अनुभव कथन केले. यामुळे सर्व मित्र – मैत्रिणीना आपला स्नेही, सखा कोणत्या परिस्थितीत आहे हे कळून गेले. या दोन दिवसांत चंदू नेवे, ओमप्रकाश शर्मा, डॉ. रविंद्र जैन गोविंद लाड आदींचे सत्कार करण्यात आले. प्रमोद चायल यांच्याकडून सर्व उपस्थितांना चांदीचा शिक्के वाटप करण्यात आले. लक्षवेधक उपक्रम म्हणजे प्रत्येक मित्राचा स्वतंत्र कव्हर पेजवर फोटो आणि मधल्या पेजवर स्वतः चा परिचय अशी एक डायरी देण्यात आली नास्ता, जेवणासह गेम खेळण्यात आले. यात प्रामुख्याने “दमशराज”, “हाऊजी”, “तू चल मैं आई” ,”रुप तेरा मस्ताना” अंताक्षरी असे विविध गेम खेळण्यात आले.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

संध्याकाळी संदीप सोनार, सचित भारती यांचे स्वर संध्याचा कार्यक्रम ठेवण्यात आले. यात सर्व जुने गाणे गायन करण्यात आले ह्या गाण्यांवर अनेकांनी ताल धरला. ६५ वर्षांचे आपले निवृत्तपण सोडून बालपणाच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी परिवारासोबत ताल धरला. आणि मनसोक्त नाचले या दोन दिवसांत एक दिवसाचे जेवण सुरेश बडगुजर यांच्या फॉर्म हाऊसला केल्याने वन भोजनाचा देखील आनंद घेण्यात आला. हा सुंदर कार्यक्रमाचे फोटोग्राफी नंदकिशोर पाटील यांनी केले तसेच सर्व मित्रांनी आप आपल्या जवळील जुने फोटो देखील आणले होते ते देखील पाहण्यात आले. यावेळी अनेकांना जुन्या स्मृति पटलावर आल्या. केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आनंदराज पॅलेसचा हॉलचे व रूम ज्यांनी मोफत उपलब्ध करून दिले ते डॉ. निर्मलकुमार टाटीया, मनिष, चेतन टाटीया यांचे देखील सत्कार करण्यात आले.

या स्नेह मेळावासाठी जळगाव, पुणे, अमळनेर, नाशिक, मबुई, राजस्थान, गुजरात अश्या विविध ठिकाणहुन मित्र मंडळी आली होती. यावेळी सुरेश पोतदार, सुरेश टाटीया, विनोद पालिवाल, सौ.वीणा गुजराथी, मनोहर कुलकर्णी, अजीत गुजराथी, महेश जैन, प्रताप पाटिल, वासुदेव करोडपती, शांतीलाल जैन, मैना मालू, प्रतिभा पाटील, अनिल तोतला, प्रदिप जोशी, प्रेमलता टाटीया, राजूभाई पाटील, अरुण अग्रवाल, अरुण महाजन, हेमंत अग्रवाल, हरीष लोहार, अशोक मेमाने, तुलसीराम पाटील, विष्णु पोतदार, जगन्ननाथ पाटील आदिंनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

चोपड्यातील प्रिया शिक्षा फाउंडेशन कॉमर्स क्लासेसचे घवघवीत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे अभिनेत्री तन्वी मल्हाराने केले उद्घाटन

August 22, 2024

*ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे ‘शिक्षक’ हे भावी पिढीचे शिल्पकार- रोहिणी खडसे*

September 5, 2024

पालिका निवडणुका मे-जून महिन्यात होण्याचे संकेत ; ‘या’ आदेशातून समोर आली मोठी माहिती !

April 25, 2022

‘संभाजीनगर’वरून शिवसेनेची कोंडी; औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध : बाळासाहेब थोरात

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group