धरणगाव (प्रतिनिधी) ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी. मागास वर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे. तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी काल ओबीसी जनमोर्चा धरणगावतर्फे धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे धरणगाव तालुका अध्यक्ष श्री. किशोर दौलत कंखरे, मल्हार सेना शहर प्रमुख श्री.पप्पू कंखरे, शेफर्ड टायगर फोर्स इंडीया धरणगाव तालुका अध्यक्ष श्री. संजय धामोळे, समाजसेवक श्री.संतोष भडांगे सर, श्री.हिलाल बच्छाव, सुरेश कंखरे, शाम बिर्हाडे,शुभम कंखरे, अमोल कंखरे, अतुल परिहार, राहुल कंखरे, क्रिष्णा बिर्हाडे, तुषार धनगर यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.