TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान !

धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रतिपादन !

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) 16 ऑगस्ट – मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची पट संख्या वाढवावी. प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहावे. शिक्षकांनी ड्रेस कोड वापर करावा, पायी शिक्षण घेणाऱ्या मुलींना 1 हजार सायकलींचे वाटप करण्यात येणार असून जिल्ह्यातील जिप शाळांच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. बसविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून शाळेचा जिल्हा व राज्यस्तरावर नावलौकिक वाढवावा असे आवाहन करून माझी शाळा – सुंदर शाळा हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव इंदिरा कन्या विद्यालय येथे शिक्षण विभागा मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील हे होते.

शिक्षकांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज.- शिक्षणाधिकारी विकास पाटील !

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मधून 740 शाळाना वाल कंपाउंड बांधकाम, 6951 शाळांना विजेची सोय, पंखे व दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त शाळांमध्ये सेमी वर्ग सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी नवीन शाळा खोल्या बांधकाम, शाळा वर्ग दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने शाळांना भौतिक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भूमिका घ्यावी व स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन केले.

हे आहेत विजेते मानकरी !

या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून प्रथम क्र. झुरखेडा जिल्हा परिषद शाळा, द्वितीय क्रमांक- भोणे जिल्हा परिषद शाळा, तृतीय क्रमांक – अनोरे जि. प. प्राथमीक शाळा त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळा अंतर्गत प्रथम क्रमांक- इंदिरा माध्यमिक विद्यालय, धरणगाव, द्वितीय क्रमांक-आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालय, पथराड तर तृतीय क्रमांक- साळवे इंग्रजी शाळा, साळवे या विद्यालयाला मिळाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रक्कम रुपये सह शिल्ड व प्रमाणपत्र त्या – त्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व सरपंच यांना देण्यात आले. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 91 शाळा व खाजगी 69 अश्या 160 शाळांनी या अभियानात सहभाग नोदवला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

चित्रकला स्पर्धेतील चिमुकल्यांना पालकमंत्र्यांनी दिले बक्षीस !

या कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर तसेच मोठे पुस्तक इत्यादी साहित्याचे वाटप तसेच चित्रकला स्पर्षेत विजेत्या 16 विद्यार्थ्यांना पालकमंत्री यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ . भावना भोसले यांनी केले, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक किरण चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले.

या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, तालुका प्रमुख, डी. ओ. पाटील, शाळा संस्थेचे चेअरमन सी. के. पाटील, मुख्याधिकारी जनार्दन पवार, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील, भानुदास विसावे, मोतीआप्पा पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
Next Post

मतदान केले नाही म्हणून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी दांडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये मंत्रीही सहभागी होणार ; मेड इन इंडिया लशीसाठी सज्ज

November 19, 2020

जि.प., पं.स.च्या आरक्षण सोडतीसाठी १३ रोजी सभा ; ७७ गट, १५४ गणांचे आरक्षण काढण्यात येणार !

July 7, 2022

तरुणीने बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका…जाणून घ्या…संपूर्ण थरार !

October 27, 2021

कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप ; राजू श्रीवास्तव यांचे निधन

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group