TheClearNews.Com
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात !

महापौरांनी केली पाहणी : संपूर्ण प्रक्रियेची घेतली माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतात कोरोना लसीकरणाला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. जळगाव शहरात मनपाच्या डॉ. डी. बी. जैन रुग्णालयात महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पहिल्या लाभार्थ्यांला लस देण्यात आली. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे पालन होते आहे की नाही याची देखील महापौरांनी माहिती घेतली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यास शनिवारी जळगाव शहरात सुरुवात करण्यात आली. लसीकरणप्रसंगी डॉ. बी. एम. जैन रुग्णालयात महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. सायली पवार, डॉ. नेहा भारंबे, डॉ. सोनल कुळकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे आदींसह सर्व रुग्णालय सेविका, कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

जळगाव मनपाचे चोख नियोजन

जळगाव शहरासाठी पहिल्या टप्प्यात १००० डोस उपलब्ध झालेले आहेत. प्रत्येक दिवशी चार टप्पे करून एका वेळी २५ लाभार्थ्यांना डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या केंद्रावर सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पहिला डोस देण्यात आला. लसीकरण केलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ४ डॉक्टर आणि १ भुलतज्ञ व कर्मचारी असे पथक आहे. प्रत्येक व्यक्तीला अर्धा तास निरीक्षणात ठेवण्यात येणार असून जर त्या व्यक्तीला खाज येणे, मळमळ होणे, चक्कर येणे, ताप येणे, सूज येणे असा काही त्रास झाल्यास तात्काळ उपचार करण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीला अधिक त्रास जाणवल्यास अगोदर ऍड्रीनालीन व हायड्रोकॉल्टीसॉल्ट हे इंजेक्शन दिले जाईल. रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

महिनाभराने दिला जाणार दुसरा डोस

कोरोना लसीकरण करताना सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर पहिल्या फळीत काम करणारे कामगार आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी लाभार्थ्याची एक दिवस अगोदर नोंदणी केली जाते त्यासाठी ओळखीचा पुरावा घेतला जाऊन सॉफ्टवेअरमध्ये माहितीची नोंदणी करण्यात येते. लसीकरण झाल्यावर संबंधीत व्यक्तीला मोबाईलवर संदेश येतो आणि एक प्रमाणपत्र देखील पाठविण्यात येते. लाभार्थ्याला माहिन्याभराने दुसरा डोस देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी, महापौरांनी घेतला आढावा

मनपाच्या डी. बी. जैन रुग्णालयात महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील येऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर भारती सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ.प्रितम मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सर्व लसीकरणाच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
जळगाव

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 9, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
Next Post

अमळनेरात विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संभाजीराजें राज्यसभेची निवडणूक लढणार नाही ; म्हणाले, ही माघार नाही, माझा स्वाभिमान !

May 27, 2022

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

April 29, 2021

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत

March 9, 2022

बापरे ! चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराकडून वकिलास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

April 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group