TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची स्थापना

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील भूमिमातेच्या एकमेव मूर्तीसह श्री पंचमुखी मारुती व श्री मंगळदेव ग्रहाच्या पंचधातूच्या उत्सव मूर्तीची संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी या कार्यक्रमास भरीव अर्थसहाय्य केले.

तीन दिवस चाललेल्या या महासोहळ्याचे मुख्य यजमान मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व आशा महाले होते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या विविध पूजा विधींमध्ये सपत्नीक सहभागी झाले होते. श्री भूमिमाता व श्री पंचमुखी मारुती च्या प्रत्येकी साडेतीन फुटी मूर्ती काळया पाषाणातील आहेत. कर्नाटकातील गदग येथील घरंदाज व निष्णात मूर्तिकारांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या दाक्षिणात्य शैलीत या मुर्त्या घडविल्या आहेत. त्यासाठी त्यांना तीन महिन्यांहून अधिक कालावधी लागला. धुळे येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, निवृत्त पोलिस उपअधीक्षक शामकांत सोमवंशी, तहसीलदार सुदाम महाजन व मिलिंद वाघ, जळगाव येथील आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक अभिषेक बाफना, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे ,खारघरचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, नाशिक येथील विक्रीकर उपायुक्त विजय पवार, ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, धुळे येथील ज्येष्ठ वकील देवेंद्र कुमार शिरोडे, ॲड. प्रदीप भट, संत सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीप (राजू) नेरकर( नाशिक), छडवेल कोरडे (तालुका साक्री) येथील माजी सरपंच रत्नाकर पाटील, मॅनेजमेण्ट एक्सपर्ट वेदांशू पाटील ( नाशिक ) पाटबंधारे विभागाचे निलेशराव तराठे (जळगाव), सहाय्यक प्राध्यापक अतुल साबे( चोपडा ), बिल्डर श्यामशेठ गोकलानी ,प्रसन्न पारख व भरत सैनदाने , कॉन्ट्रॅक्टर शशिकांत पाटील (पाचोरा), मुख्याध्यापक पी. एल. मेखा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल पाटील (मालेगाव ,माजी मुख्याध्यापक राजेंद्र निकुंभ, शिक्षक तथा पत्रकार विनोद कदम व उमाकांत हिरे, दैनिक लोकमतच्या जाहिरात विभागाचे रवींद्र बोरसे, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य दिलीप गांधी व मनिष जोशी, रोटरी क्लबचे सदस्य विशाल शर्मा व आशिष चौधरी हे मान्यवर तीन सत्रात झालेल्या हवनात्मक पूजा – विधीत सपत्नीक सहभागी झाले होते.
तीन दिवसात राजकीय, सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. त्यांना शक्य तितक्या वेळ ते पूजेतही सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे तसेच अनेक सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले. ख्यातनाम पुरोहित केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते. तर प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य ,गणेश जोशी, यतीन जोशी, अथर्व कुलकर्णी, सारंग पाठक, निलेश असोदेकर, अंबरीष कळवे, शुभम वैष्णव, सुनील मांडे, मयुर जोशी (नेवासा) परशुराम जोशी (नाशिक) सागर कुलकर्णी व प्रदीप जोशी (अहमदनगर) सहाय्यक पुरोहित होते .

READ ALSO

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

भूमियागासाठी अमळनेर ठरणार अद्वितीय

साधारणत: ज्यांना रेती,शेती, माती, जमीन -जुमला, घरा – दाराच्या समस्या असतात अशी मंडळी म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर्स, दलाल आदी या समस्यांच्या निवारणार्थ किंवा वरील क्षेत्रात उत्तम व्यावसायिक यशासाठी भुमियाग करतात. या सर्व बाबींचे मूळ भूमि आहे. अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात पूर्वीपासून भूमिपुत्र श्री मंगळग्रहाची मुर्ती होतीच. आता भूमिमातेची मूर्ती स्थापित झाली आहे. या दोन्ही देवतांच्या मूर्तींच्या साक्षीने होणारा भुमियाग आता विशेष अलौकिक व प्रभावी होईल अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. या दोन्ही देवतांच्या मूर्ती एकाच ठिकाणी विश्वात कुठेही नाहीत. त्यामुळेच आता अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर विश्वात भोमयागासह अन्यही पूजा – विधी तथा अभिषेकासाठी अद्वितीय ठरणार आहे. परिणामी धार्मिक क्षेत्रात अमळनेरचे नाव वैश्विक पातळीवर ठळकपणे अधोरेखित होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा लढायला तयार : खासदार धानोरकरांचे मोदींना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 1 जून ते 7 जून 2025

June 1, 2025

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022

वीस दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद… नागरिकांमध्ये संतापाचा सूर!

July 11, 2025

घरगुती गॅसचा काळाबाजार ; दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group