बोरगाव ता. धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेने सध्या राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे पशुपालकाचे हाल होताय. बोरगाव येथे तर उपचाराअभावी म्हशीचा मुत्यु झाला आहे.
पशुवैद्यकीयच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवेवर १९८४ च्या कायद्याने टाच आणल्याने महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेचे राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाच्या दरम्यान, बोरगाव येथील सुभाष दौलत नांदडे यांच्या म्हशीचा मुत्यु झाला आहे. या संपाबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पशुपालकांकडुन होत आहे. खाजगी डॉक्टरांनी प्रॅक्टिस बंद केली आहे. दरम्यान, आता दगावलेल्या म्हशीचे नुकसान कोण भरुण देणार?, असा सवाल पशुपालकांकडुन उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.