धरणगाव (प्रतिनिधी) येथील प. रा. विद्यालय राष्ट्रीय छात्र सेना, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनानिमित्त योग शिक्षक गोपाल चौधरी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी योगासने,योग साधना व प्राणायामचे धडे घेतले.
सुरवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी, मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी योगारोग्याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने व प्राणायाम केला केले. रोज एक तास योगा व प्राणायामासाठी देणार असल्याचा संकल्प योग शिक्षक गोपाल चौधरी यांनी सुमारे ६१२ विद्यार्थ्यांकडून करून घेतला. उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मेजर डॉ.अरुण वळवी, एनसीसी चीफ ऑफिसर डी.एस.पाटील, डॉ. बी.डी.शिरसाठ, निरज शिंदे, रामचंद्र धनगर,रवींद्र पाटील, संजय मोरे, डॉ. वैशाली गालापुरे, सुरेखा तावडे, वंदना सोनवणे यांच्यासह ४० शिक्षक व १५० पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डी.एस. पाटील तर आभारप्रदर्शन डॉ. अरूण वळवी यांनी केले.