TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात

औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, पत्रकार आदींची बैठक उत्साहात पार पडली.

भारतात दरवर्षी २१ एप्रिल नागरी सेवा दिन साजरा केला जातो. हा दिन प्रशासकीय सेवेतील व्यक्तींच्या समर्पित सार्वजनिक सेवेच्या सन्मानार्थ आणि लोककल्याणासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी पाळला जातो. त्याचप्रमाणे, १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, जो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसोबतच मराठी संस्कृती, परंपरा आणि प्रशासकीय कर्तृत्वाचा उत्सव आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रसंगांचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यात दि.२१ एप्रिल,२५ (नागरी सेवा दिन) ते ०१ मे,२५ (महाराष्ट्र दिन) या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत धरणगाव तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी, व लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना वाढविणेसाठी, चालना मिळण्यासाठी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी तालुक्यातील सर्व उद्योजक, व्यापारी, कामगार संघटना, शेतकरी संघटनाचे पदाधिकारी यांचेसोबत उद्योग व्यवसायावर विविध चर्चा झाली. तहसीलदार सूर्यवंशी यांनी सांगितले की, सदर मोहीम यशस्वीपणे राबविल्यास लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची निर्मिती होईल. यामुळे नागरिकांचे जीवनमान सुकर होईल, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होतील आणि शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. यावेळी एमसीइडी जिल्हा समन्वयक (जिल्हा उद्योग केंद्र) समीर भाटिया, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक निलेश चौधरी, भाजप नेते ॲड. व्ही एस भोलाणे, कृषी अधिकारी के एच देसले, व्यापारी असो. अध्यक्ष संजय कोठारी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, मेडिकल असोसिएशन सचिव छोटू जाधव, लेखापाल आर जी पाटील, वाय एस बेडसे, माजी नगरसेवक तथा शेतकरी भागवत चौधरी, एचडीएफसी बँकचे प्रफुल सोनवणे, अभि.सहा. आर एच चौधरी, महसुलचे वरिष्ठ लिपिक गणेश पवार, उद्योजक निखिल बयस, माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ, पत्रकार विनोद रोकडे, निलेश पवार आदी उपस्थित होते. विशेष मोहीम कार्यक्रम अंतर्गत बैठक यशस्वीतेसाठी कृष्णा बाविस्कर, साकिब खान, विशाल सोनार, शांताराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 25 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास !

September 30, 2021

सुब्रोतो फुटबॉल चषक : १४ वर्षा आतील मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन उप विजयी !

August 1, 2023

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड !

January 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group