TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तहसीलदार अॅक्शन मोडवर ; नांदेडजवळ शंभर ब्रास वाळूचे साठे जप्त !

पावसाळ्यात जादा दराने विक्रीसाठी वाळूचे साठे ; कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड, ता. धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही वर्षापासून धरणगाव तालुका वाळू तस्करीसाठी कुविख्यात झाला होता. परंतू नवीन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार सांभाळताच वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम सुरु केली आहे. वाळू चोरीचे रस्ते बंद केल्यानंतर आता चक्क नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मागील काही वर्षापासून धरणगाव तालुक्यातील वाळू माफिया भलतेच मुजोर झालेले होते. अगदी महसूल विभाग खिशात असल्यागत काही जण वागत होते. अगदी तहसीलकार्यालयातील त्यांचा वावरही त्याच पद्धतीचा होता. परंतू तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरु केल्यामुळे धरणगाव महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा उंचवायला सुरुवात झाली आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

सुरुवातील तहसीलदार सूर्यवंशी यांनी नांदेड गावातील वाळू चोरट्यांचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने चर खोदून बंद केला. यामुळे चोरट्या वाळू वाहतुकीलगाम बसला होता. पावसाळ्यात जादा दराने वाळू विकता यावी, यासाठी परिसरात काही वाळूमाफियांनी वाळूचे साठे तयार करून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यवंशी यांनी वाळूसाठ्यांना जप्त करण्याचे आदेश दिलेत. बुधवारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संदीप मोरे, नांदेडचे प्रभारी तलाठी भागवत पवार, बाभूळगावचे तलाठी शेख, पोलिस पाटील शशिकला सैंदाणे यांनी पंचनामे केले.

पंचनामे करण्यात आलेली वाळू उचलून धरणगावला शासकीय जागेतनेण्यात येणार होती. परंतू पावसामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सूर्यवंशी यांनी दिवसरात्र या साठ्यांवर गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. जप्त वाळूसाठ्यांची जबाबदारी पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

खळबळजनक : केटर्सचे काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या महिलेवर दोघांचा अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बजमे उर्दू अदबतर्फे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात !

March 1, 2022

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

June 15, 2021

देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच ; २४ तासांत तब्बल ३,५२,९९१ कोरोनाबाधितांची नोंद

April 26, 2021

‘या’ जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला कोरोना ; शाळा व परिसर सील !

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group