TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावकर हो…ऐकलंत का?… शिंदे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत बरं !

धरणगाव-एरंडोल तालुका शेतकी संघात राष्ट्रवादीचे संजय पवार यांच्या सौभाग्यवतीसह भाजपची एक महिलाही बिनविरोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या काही दिवसापूर्वी मोठ्या जोशात एकमेकाविरुद्ध दंड ठोकून लढणारे शिंदे आणि ठाकरे गट धरणगाव तालुका शेतकी संघाची निवडणूक एकत्र लढविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परंतू याबाबत उघड कुणीही बोलायला तयार नाहीय. पण या निवडणुकीचे सर्वात धक्कादायक तंत्र म्हणजे…महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांना या अकल्पित युतीबाबत सुगावा न लागू देता, हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच काय तर राष्ट्रवादीच्या संजय पवार यांच्या सौभाग्यवतीसह भाजपची एक महिलाही बिनविरोध झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

धरणगाव तालुका शेतकी संघामध्ये एकूण १५ जागा आहेत. याबाबत प्राथमिक बोलणीत अनेकांनी ही निवडणूक बिनबिरोध करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण शिंदे आणि ठाकरे गट एकत्र कसे येणार ?, याबाबत मंथन सुरु होते. परंतू धरणगाव तालुक्यातील ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन महत्वपूर्ण नेत्यांनी एकत्र युती करण्याची तयारी दाखवली. त्याला कारण म्हणजे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही बाजूने मोठा आर्थिक बोजा पडला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत ठराविक नेत्यांनीच आर्थिक डोलारा सांभाळला होता. तर बहुतांश जणांनी हात वर केले होते.

READ ALSO

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

धरणगाव तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत भाजप ४ , शिवसेना (शिंदे गट) ५, राष्ट्रवादी (संजय पवार गट) ३, सुरेश चौधरी (ठाकरे गट) ३, अशी वाटप ठरली असल्याचे कळते. परंतू याबाबत अधिकृत कुणीही बोलायला तयार नाहीय. तर दुसरीकडे  राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या धर्मपत्नी सोनाल पवार (चांदसर) आणि भाजपच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिभा दिनेश पाटील (भोणे) ह्या आज बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटांना भाजपने टेकू दिला असल्याचेही चित्र समोर येत आहे.

धरणगाव तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत कट्टर दुश्मन समजले जाणारे शिंदे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढत असल्याचे आज तरी स्पष्ट चित्र आहे.परंतू त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष एकत्र येऊन उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचेही कळते. त्यामुळं भविष्यात नेमकं काय होईल?, हे आता बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

धक्कादायक म्हणजे दोन्ही बाजूच्या अनेक मोठ्या नेत्यांना विचारात घेतले गेले नसल्यामुळे आज माघारीपूर्वी मोठी शाब्दिक चकमक झाल्याचेही कळते. आता पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडल्या किंवा घडताय, हे निकालानंतरचं स्पष्ट होऊ शकणार आहे. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनल जर बनले तर त्याचे नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार आणि धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक  सुरेशनाना चौधरी करतील असे कळते. त्यामुळं आगामी काळात मोठ्या घडामोडी बघायला मिळण्याची शक्यता वर्तली जात आहे. तर पक्षांतर्गत वादविवाद देखील समोर येण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १२ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : तरूणीचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला पाठलाग करून पकडले !

September 8, 2024

शिरसोली येथील एका महिन्याच्या बालकाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची मदत !

January 10, 2023

कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : मद्रास हायकोर्ट

April 26, 2021

पिंप्राळा परिसरात महानगरपालिकेने दवाखाना सुरू करावा ; मनसेची मागणी

April 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group