TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जे जमते त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

धरणगाव शिक्षण विभाग व स.न.झवर विद्यालय पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जे जमते त्याच्यावरच विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. वाचन हे महत्वाचे मुलभूत कौशल्य असून वाचन जाणीव पूर्वक शिकले पाहिजे. आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी “महावाचन चळवळ” उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथिल स. न. झवर माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व जिल्हास्तरीय “महावाचन चळवळ ” उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सह मान्यवरांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारित आहे. ग्रामीण भागात बुद्धिमत्ता असून तिला योग्य वळण देण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हावे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जास्तीत जास्त वाढी साठी शिक्षकांनी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती. भावना भोसले यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व जिल्हास्तरीय “महावाचन चळवळ ”उपक्रमाची माहिती सविस्तरपणे विषद केली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग पंचायत समिती, धरणगाव व स. न. झवर विद्यालय पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनात माध्यमिकचे ४८ तर प्रथामिकाचे ५७ अश्या एकूण १०५ शाळांनी सहभाग नोंदवून, विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्याभरातून विविध शाळांनी प्रतिसाद देत शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. सदर विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षणाचे कार्य केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा सोनवणे , एच. झेड. पाटील , कर्णसिंग पाटील, प्रदीप नारखेडे व एम. एस. कांडेलकर यांनी केले.

जिल्हास्तरीय“महावाचन चळवळ ” आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटन समारंभास डॉ अनिल झोपे प्राचार्य डायट जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील , माध्यमिक शिक्षण अधिकारी सौ. किरण कुवर , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गट शिक्षणाधिकारी डॉ. श्रीम. भावना भोसले , एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष शरद काबरा, स.न झवर विद्यालय चेअरमन विजय झवर, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रवीण झवर, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळचे संजय काबरा , जिल्हा प्रमुख निलेश पाटील, पाळधी बु. चे सरपंच विजय पाटील , उपसरपंच राहुल धनगर, माजी सभापती मुकुंराव नन्नवरे, रविद्र चव्हाण सर, संजय महाजन, मनोज बियाणी , नाना पाटील सर , केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, न्यू इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. के. एस. पाटील, स. न. झवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस.व्ही. तोतला, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे ईशस्तवन व स्वागत गीत स. न. झवर विद्यालयाच्या मुलीनी केले.

सदर ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वीतेसाठी स.न.झवर व न्यू इंग्लिश स्कूल पाळधी मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद , सर्व केंद्रप्रमुख ,गटसाधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, धरणगाव तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व धरणगाव तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. ज्योती राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख प्रमोद सोनावणे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

विवेक ठाकरे यांची मधुस्नेह संस्था समूहात समन्वयकपदी नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस !

October 7, 2025

पैसे परत कर म्हणत महिलेच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई !

March 19, 2025

शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत! उपमहापौर सुनील खडकेंनी केली नागरिकांशी चर्चा

December 14, 2020

महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा निर्णायक क्षण: मनसेचा उदय..?

November 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group