TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि. २ एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार पालकमंत्र्यांनी तत्काळ होकार दिला होता. मध्यंतरी कोविडच्या आपत्तीमुळे अन्य कामांच्या खर्चावर मर्यादा होती. ही मर्यादा दूर झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली होती.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

जिल्हा नियोजन समितीने दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लक्ष, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजीत करण्यात आलेला आहे. पोलीस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महिला रूग्णालयाची पाहणी

दरम्यान, जिल्ह्यातील कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोहाडी रोडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने उभारण्यात आलेल्या महिला महाविद्यालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येणार आहे. या संदर्भात सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री ना. पाटील हे या हॉस्पीटलची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प कोरोनाग्रस्तांसाठी उपयोगात येणार आहे. या पाहणी प्रसंगी पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि सार्वजनीक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत हे उपस्थित राहणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ‘डिपीडीसी’वर ६ ‘विशेष निमंत्रित’ सदस्यांची नियुक्ती !

December 14, 2023

एणगाव येथील अवैध धंदे बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण ; महिलांचा इशारा !

September 20, 2022

रेवा कुटीमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा ; हनुमान चालीसा पठण, हवन, सुंदर कांड यांचे नियोजन

April 12, 2025

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील ७ संशयितांना चोपडा पोलिसांकडून अटक !

November 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group