TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी १४ एप्रिल, २०२१ रोजीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठया संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी ७.०० वाजेपासुन संध्याकाळी ८.०० वाजण्यापुर्वी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

READ ALSO

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

यावर्षी कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमीत्ताने काढणत येऊ नयेत. त्याऐवजी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्याठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी ५ पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी.

तथापि, चैत्यभुमी, दादर,मुंबई येथे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देणेसाठी मा. राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याने सदर कार्यक्रमांसाठी ५० पर्यत व्यक्तीं उपस्थित राहु शकतील. तसेच दिक्षाभुमी नागपुर येथील कार्यक्रमासाठी ५० पर्यत व्यक्ती उपस्थित राहु शकतील.

कोविड-१९ विषाणुच्या पार्श्वभुमीवर चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फ जयंतीनिमित्त चैत्यभुमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुी, दादर, मुंबई येथे न येता घरातुन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. दरवर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपुर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाटय इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क्,सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

सलून व्यवसायास लॉकडाउनची नियमात शिथिलता आणून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी ; नाभिक समाजाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतासमोर लसीकरणासाठी मोठं आव्हान ; पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींचा खर्च

December 17, 2020

खळबळजनक : साकरी-फेकरीदरम्यान जुन्या वादातून गोळीबार ; भुसावळचे दोन तरुण जखमी !

April 15, 2023

क्रूरतेच कळस : वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या ; मृतदेहाचे तुकडे करून नदीच्या पात्रात पुरवले !

February 28, 2022

सर्जा राजाच्या नावावर ‘रात्रीस खेळ चाले’ ; बंद शामियान्यात ‘नग्न डान्स’

January 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group