TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात ‘ओबीसी आरक्षण हक्क परिषद’ जळगाव व ‘खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद’ चाळीसगाव या दोन्ही परिषदेची नियोजन बैठक गावातील सर्व समाजातील ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत नुकतीच उत्साहात संपन्न झाली.

या दोन्ही परिषदेच्या नियोजन बैठकीचे प्रास्ताविक पी.डी.पाटील यांनी केले. या छोटेखानी ओबीसी नियोजन बैठकीचे अध्यक्ष धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी होते. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते डी.जी.पाटील, लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, मोमीन समाजाचे सामाजीक कार्यकर्ते शेख हाफीजोद्दीन तसेच धरणगाव शहरातील सर्व समाजाचे समाजध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

या बैठकीमध्ये लक्ष्मण पाटील, गुलाबराव वाघ, डी. जी.पाटील, ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, सुनिल चौधरी यांनी ओबीसी आरक्षण हक्क परिषद, जळगाव व खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद चाळीसगाव या दोन्ही परिषदेसंदर्भात विस्तृत अशी माहिती दिली. तसेच ओबीसींच्या सर्व समस्या मांडल्या. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींचे राजकीय – शैक्षणिक आरक्षण जे धोक्यात आले आहे ते टिकले पाहिजे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात आज मात्र ओबीसींच्या आरक्षणावरच घाला घालण्यात आला आहे, यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. आपल्या न्याय हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र आले पाहिजे अशा सूचना वरील सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ओबीसी हक्क परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहणेबाबत आवाहन केले.

ही प्रथम भव्य ओबीसी आरक्षण हक्क परिषद जळगाव येथे २५ सप्टेंबर, २०२१ शनिवार रोजी सकाळी १० वाजता “छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह”, जळगाव येथे संपन्न होणार आहे. दुसरी ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद दि. २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता ” वैभव मंगल कार्यालय “चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे. या दोन्ही परिषदेचे पत्रक उपस्थित सर्व ओबीसी बांधवांना वाटप करण्यात आले तसेच हे दोन्ही पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सएपच्या प्रत्येक ग्रुपवर व फेसबुक वर टाकण्याचे आव्हान करण्यात आले. या बैठकीची माहिती समस्त शहर व ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवावी असेही मान्यवरांनी सांगितले.

या दोन्ही परिषदेचे जळगाव व चाळीसगाव जाण्या – येण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजन बैठकीला उपस्थित धरणगाव शहरातील सर्वच समाज अध्यक्ष यांनी स्वतः गाड्या करून आपापल्या समाजातील बांधवांना या दोन्ही परिषदेला आणणार, असे आश्वासन दिले. ज्यांना – ज्यांना शक्य असेल ते ओबीसी बांधव आपापल्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर किंवा आपापल्या मित्रांच्या गाडीमध्ये येणार आहेत. ज्या – ज्या ओबीसी बांधवांना परिषदेला येण्यासाठी गाडीची अडचण असेल अशा सर्व ओबीसी बांधवांना चारचाकी गाड्यांची सोय डी.जी.पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी हे करणार आहेत. धरणगाव शहर व ग्रामीण भागातून जवळ जवळ २० ते ३० गाड्या या परिषदेला येणार आहेत. या नियोजन बैठकीचे सूत्रसंचलन व्ही.टी.माळी तर आभार कैलास माळी यांनी मानले. याप्रसंगी या नियोजन बैठकीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव शहरातील सर्व ओबीसी बांधवांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

नांदेड परिसरात बिबट्याची दहशत ; वासराचा पडला पुन्हा फडशा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

MSEB कार्यालय शेजारील झोपडपट्टी बनली अवैध दारू, गांजासह पत्त्याचा अड्डा

March 7, 2025

संतापजनक ! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीनदा बलात्कार !

May 1, 2022

परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही

June 18, 2021

भोसरी जमीन घोटाळा ; खडसेंची पुन्हा होणार चौकशी !

August 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group