TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येत्या सहा महिन्यांमध्ये स्फोटक घडामोडी, पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल ; सामनातून ‘त्या’ भाकितावर भाष्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2023
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे हवेत तीर मारणारे नेते नाहीत. जगभरातील यंत्रणांशी त्यांचा संवाद आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांच्या  या भाकितावर ‘सामना’तील रोखठोक या सदरातून भाष्य करण्यात आले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटाच्या मालिकेनंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून त्यावर भाष्य करण्यात आले आहे. स्वामी यांच्या वक्तव्यांचा दाखला देत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागू शकते, या भाकिताकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेली हेरगिरी आणि निवडणूक हेराफेरीची माहिती व डॉ. स्वामी यांनी टाकलेला नवा बॉम्ब यांची सांगड घालणे गरजेचे आहे. गार्डियन वृत्तपत्राने अनेक स्फोट केले. २०२३च्या मध्यास वॉशिंग्टनमधून आणखी स्फोट होतील व पंतप्रधान मोदींना जावे लागेल, असे भाकीत सुब्रमण्यम स्वामींनी वर्तविल्याचे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

ईव्हीएम हॅक करुन भाजपच्या पराभवाचे रुपांतर विजयात !
द गार्डियन वृत्तपत्राने यासंदर्भात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, देशातील विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. विरोधकांना शरण आणण्यासाठी इस्रायलमधील एका कुख्यात डिटेक्टिव्ह कंपनीची भारतात मदत घेतली जात आहे. ही कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते. ही कंपनी सोशल मीडियाचा वापर करुन द्वेष, धर्मांधतेचे विष पसरवत आहे. या कंपनीने ईव्हीएम हॅक करुन भाजपच्या पराभवाचे रुपांतर विजयात केले. भाजपचे नेते आम्ही लोकसभेच्या ४०० जागा जिंकू, असे म्हणतात. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इस्रायलमधील या कंपनीच्या माध्यमातून जगभरातील ३० निवडणुकांवर प्रभाव टाकण्यात आला होता, असेही ‘गार्डियन’च्या रिपोर्टमध्ये नमदू करण्यात आल्याचे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

अजित डोवाल यांची हकालपट्टी केली पाहिजे: डॉ. सुब्रमण्यम स्वामी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकीय नेते व उद्योगपतींवर आजही ‘पेगॅसस’च्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. संघ परिवाराशी संबंधित भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मागणी पुन्हा केली. ते म्हणतात, “पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. त्यांनी अनेकदा मूर्ख बनवले आहे. पेगॅसस टेलिफोन टॅपिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. वॉशिंग्टनमधून डोवाल यांचे आणखी एक भयंकर प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदी यांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर २०२३ च्या मध्यास मोदी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #PM_Narendra_Modisanjay raut

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

दुकानातील गिऱ्हाईकाच्या वादातून धरणगावात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महागाईचा स्फोट ! १ एप्रिलपासून ‘या’ वस्तू महागणार ; जाणून घ्या..तुमच्यावर किती वाढणार बोजा

March 31, 2022

मुलींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड, विश्रामाची सुविधा द्या ; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश !

June 14, 2024

देवदर्शनाहून परतताना क्रुझर जीपचा भीषण अपघात ; तीन भाविकांवर काळाचा घाला !

December 18, 2023

मोठी बातमी : सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे ; निर्मला सीतारामन यांची घोषणा !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group