धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असेलल्या भोणे गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
एकनाथ चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामाने निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. आज (बुधवार, 23 नोव्हेंबर 22) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी हे चालकासह यावल येथून नाशिककडे शासकीय वाहन (एम.एच.19 डी.व्ही.4199) ने कामासाठी जात होते. भोणे फाट्याजवळ पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीला अपघात झाला. त्यात चौधरी हे जागीच ठार झाले तर गाडीवरील चालकाला किरकोळ दुखापत झाली. भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार होता शिवाय यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणला असून पुढील कारवाई धरणगाव पोलीस करत आहेत. संशयित आरोपी ट्रक चालकाला धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.