१,ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर शहरात र मुस्लिम समाजाचे अंतिम प्रेषित यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या समानार्थ राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत अपशब्द बोलून जीभ कापण्याची, तसेच मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली त्याचा आज जळगाव तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला तसेच नितेश राणे वर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी एक मुखी मागणी एकता संघटन, सर्व धर्मीय व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.
सदर आशयाची प्रथम खबर पोलीस उपविभागीय अधिकारी जळगाव भाग संदीप गावित यांना तक्रार कर्ते फारुख शेख यांच्या नावे सुपूर्त करण्यात आली.
तक्रारीचा सारांश
आमदार नितेश राणे हे लोकसेवक असून त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे दंगा घडून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभक भाषण केलेले आहे त्यामुळे धर्माच्या कारणावरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढले असून एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती केलेली आहे. सदरची कृती मशिद मध्ये म्हणजे उपासना स्थळी करण्याची धमकी दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे कृत्य केलेले आहे.लोकसेवक असून त्यांनी व्यक्ती व समाजाला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केलेली आहे व निर्देशाचा भंग केलेला आहे. एवढेच नव्हे तर मुस्लिम धर्माचा व धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी पुरस्सर व दुष्ट हेतूने कृती करून धार्मिक भावना दुखावलेले आहे. तसेच मशिदीत घुसून मारणार व जीभ कापणार असे बोलून फौजदारी पात्रता दपटशा दिलेल्या आहे व शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक आगळकी होण्यास साधक अशी विधाने केलेली असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९२,१९५,१९७,१९८,१९९,
२९९,३०२,३५१,३५२ व ३५३ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी तक्रार दाखल केलेली आहे.
अभ्यास करून निर्णय घेऊ
शिष्टमंडळाला जळगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी तक्रार ऐकून घेत सदर तक्रारीबाबत अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊन आपले समाधान करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शिस्ट मंडळात यांचा होता समावेश
एकता संघटनेचे मुफ्ती खालिद,फारुक शेख व नदीम मलिक यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, मझहर खान, अनिस शहा, अली अंजुम रजवी, मुफ्ती हारून, एजाज मलिक, कुर्बान मेंबर फैजपूर, जमील शेख, सलीम इनामदार, शिभान फाइज्, बाबा देशमुख जहांगीर खान, तौसिफ पटेल, अर्शद शेख,खलील आयलेकार, मोहसीन काकर, तन्वीर शेख, अमजद खाटीक, मुजाहिद खान, जहीर शेख, जलाल शेख,
फैझान सय्यद, फहाद मलिक, साद सय्यद , राजा मिर्झा, सैफ अली, अल्तमस बागवान ,याकूब खान, नदीम खाटीक, इरफान शेख, शेख जमील, हाजी युसुफ, फिरोज शेख, मुदस्सीर शेख, अरशद शाह, आदिल शहा, आसिफ शाह, शरीफ बाबा, अशपाक मिर्झा , अनस शेख, शोएब खान, इरफान शेख, अश्फाक पठाण, अकील पठाण, आजाद पटेल, सय्यद बिलाल, सय्यद अफात, माज मलिक, जमील शहा, शाहिद पिंजारी, मोहम्मद उसामा, सय्यद सफवान, सय्यद कबीर, अली मलिक, आदींचा समावेश होता.