TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दान देण्याचे अनेक प्रकार आहेत. धन, दौलत, पैसा यांचे महत्व माणूस जिवंत असेल तरच असते. म्हणून, माणसाला जिवंत ठेवणारे अन्नदान हेच जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जगाचा पोशिंदा उपाशी राहू नये म्हणून त्याच्या जेवणाची सोय करून आपल्या घरातील अन्नपूर्णेच्या स्मृती जतन करणे कौतुकास्पद कार्य असल्याचे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

उद्योगपती जिवनसिंह बयस यांनी पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेल्या स्व.ज्योतीदेवी अन्नपुर्णा भंडारच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रा. डी. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उद्योगपती जिवनसिंह बयस, नयन गुजराथी, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. माणूस आणि पशूपक्षी यांच्यात देव शोधण्याची परंपरा संतांनी आपल्याला घालून दिली आहे. जीवघेण्या स्पर्धेच्या सद्याच्या काळात माणूसपण हरवले आहे. अशा काळात मातीत राबणारा बळीराजा निर्सगाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. रक्ताचे पाणी करून आपले पीक बाजारात आणतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याची अबाळ होवू नये यासाठी उद्योगपती जिवनसिंह बयस यांनी पत्नी, माजी नगरसेविका स्व.ज्योतीताई बयस यांच्या जयंती दिनी मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दारात भरपेट जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. स्व.ज्योतीदेवी बयस अन्नपूर्णा भंडारच्या माध्यमातून शहरातील निराधार, गरिब, ज्यांची दोन घासांसाठी सुध्दा अबाळ होते अशा ४० कुटूंबांना घरपोच दोन वेळेचे जेवण मोफत दिले जाणार असल्याचे सांगून ना.गुलाबराव पाटील यांनी बयस कुटूंबियांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा.डी.आर पाटील यांनी स्व. ज्योतीताईंच्या स्मृतींना उजाळा दिला. स्व. ज्योतीताई या बयस कुटुंबातील अन्नपुर्णाच होत्या. अन्नदानाचा यज्ञ त्यांनी अखंड सुरू ठेवला होता. त्यांच्या जाण्याने हे कार्य बंद पडेल असे वाटत असतांना त्यांच्या कुटूंबियांनी सुरू केलेले स्व.ज्योतीदेवी बयस अन्नपूर्णा भंडार हे त्यांच्या स्मृतींना अखंड उजाळा देतील असे प्रतिपादन केले. बयस कुटूंबियांशी आपले लहानपणापासूनचे संबंध असल्याचे सांगून समाजाला नेहमीच देत राहण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्व.ज्योतीताईच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून धरणगाव पंचक्रोशीत अन्नदानाचा कोणाताही कार्यक्रम असे त्यात बयस कुटूंबाचा सहभाग राहतोच असे सांगितले.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, महावीर जिनिंगचे संचालक सुभाषआबा पाटील, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, नंदकिशोर पाटील, माजी उपनगराध्यक्ष गजाननसिंह बयस, उद्योगपती वाल्मिक पाटील, दिलीपबापू पाटील, रविंद्र कंखरे, मोहन महाजन, पी.एम.पाटील, मंगलदास भाटिया, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, धिरेंद्र पुरभे, शैलेश चंदेल, प्रशांत देशमुख, सुर्यवंशीसर यांच्यासह जिनिंग, प्रेसिंगचे मालक, शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन किरण अग्निहोत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास बयस, मुकेश बयस, निखील बयस, वान बयस, पंकज बयस, निलेश बयस, तेजेंद्र चंदेल, दत्तात्रय चौधरी, हर्षल बयस, राजू ठाकूर, यशपाल चंदेल, चेतन चंदेल, नीक बयस, महेंद्र बयस, बिपीन भाटिया, जितू बयस आदींनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : 'त्या' दोन ट्रकमधील कागदपत्रांतून पुराव्यांच्या छाननीला वेग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मणिपूर जाणाऱ्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला

June 29, 2023

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १९ जून २०२३ !

June 19, 2023

नथुराम गोडसे ट्विटरवर ट्रेंड ; काँग्रेसचा आक्षेप

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group