TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते !

राष्ट्रीय फलोत्पादन परिषद तांत्रिक सत्र सादरीकरणात तज्ज्ञांचा सूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उत्पादन करताना उत्तम प्रतीचे बी बियाणे, उच्चकृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वतशेती करून, सूक्ष्म सिंचन फर्टिगेशन तंज्ञानाचा वापर सर्वात महत्त्वाचे म्हणजे काढणी पश्चात तंत्र (फ्रुट केअर), ग्राहकांपर्यंत चांगल्या वेष्टनात फळे जाणे हे महत्त्वाचे ठरते. शेतात पिकविलेल्या शेतमालाची मूल्यवृद्धी साखळी खूप मोलाची ठरते याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा तज्ज्ञांनी केली. जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी तज्ज्ञांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनाबाबत विविध विषय तज्ज्ञांचे सादरीकरण झाले त्यात वरील संदर्भात विचार व्यक्त केले गेले. या तांत्रिक सत्र सादरीकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. एच.पी. सिंग, को-चेअरमन एस. के. मलहोत्रा आणि डॉ. डी.एन. कुळकर्णी होते.

आजच्या तिसऱ्या दिवसाचे सादरीकरण सीआरआयचे डॉ. रमेश एस.व्ही. यांच्या सादरीकरणाने झाले. त्यांनी नारळाचे मूल्यवर्धन करणारे उत्पादने व शाश्वतता याबाबत आपले सादरीकरण केले. गुणवत्ता असेल तर ग्राहक हव्या त्या किंमतीला वस्तू विकत घेतात असे नमूद केले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी डॉ. डी.एन. कुळकर्णी यांनी फळे व भाजीपाला याविषयीचे मूल्यवर्धन व वास्तवता याबाबत सादरीकरण केले. भाजीपाला व फळांच्या उत्पादनात भारताचे असलेले स्थान व जागतिक बाजारपेठेत भारताचा अधिक वाटा वाढविण्यासाठी काय करायला हवे याबाबत सादरीकरण केले. फळे व भाजीपाला निर्यातीत भारत का कमी पडतो याबाबतची कारणमिमांसा देखील त्यांनी केली. वैश्विक पातळीवर आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागते. गुणवत्ता व किंमत हा घटक देखील भारतातून होणाऱ्या निर्यातीसाठी अत्यंत प्रभावी घटक असतो. निर्यात वृद्धीसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत डॉ. कुळकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली.

जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी. पाटील यांनी देखील केळी व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत मोलाचे सादरीकरण केले. प्री आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला. भारतात इतर देशांच्या तुलनेने केळी लागवड क्षेत्र अधिक असून देखील केळीची नगण्य निर्यात होते याबाबतच्या मुख्य कारणांवर चर्चा केली. इराण, यूएई, दक्षिण आफ्रिकेत भारतातून केळीची निर्यात होते ती निर्यात वाढण्याची संधी आहे याबाबतचा विश्वास के.बी. पाटील यांनी व्यक्त केला. केळीची काढणी व पॅकहाऊसमध्ये पॅकींग केल्यास आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळला जाईल. केळी हे अत्यंत संवेदनशील फळ असून त्याची फ्रुट केअर जितकी जास्त घेतली तितके अधिकचे मूल्य मिळू शकते याबाबत सांगितले.

भारतातील मसाले उत्पादन व मूल्यवर्धन याबाबत डॉ. निर्मल बाबू यांनी सादरीकरण केले. भारतात पिकणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांना जगात मोठ्या प्रमाणावर मागणी आणि भविष्यात खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगत जागतिक पातळीवर भारताचा असलेला वाटा व तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याबाबत सांगितले. आले आणि हळद या दोन्ही पिकांच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत. आयुर्वेदात हळदीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. मसाल्याच्या पदार्थात हळदीचा अग्रभागी सहभाग आहे तो औषधी उद्योगात देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. भारताला भविष्यात या क्षेत्रात विकासाच्या कशा व किती मोठ्या प्रमाणावर संधी आहे त्याबाबत अत्यंत प्रभवीपणे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील मिनिस्ट्री ऑफ अॅग्रिकल्चर अँण्ड फार्मर्स वेल्फेअरचे वरीष्ठ अधिकारी बिनोद आनंद यांनी देखील भारतातील शेती उत्पादनांची मूल्यवर्धन, मूल्यवर्धन साखळी कशा पद्धतीने कार्यरत आहे व त्यासाठी शासनाचे पाठबळ कसे मिळते याबाबत चर्चा केली. अत्यंत सहज व रंजक पद्धतीने त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. बीएयू साबोर भागलपूर बिहार येथील डॉ.एम.फिजा अहमद यांनी आपले सादरीकरण केले. सीआयसीआरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी शेतीमाल व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्याच प्रमाणे डॉ. दिनेश कुमार, डॉ. एस.एम. जोगधन, डॉ. रश्मी कुमारी, डॉ. नवीन कुमार यांनी देखील तांत्रिक सादरीकरण केले.

या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी उत्तम गुणवत्तेचे बी-बियाणे, अत्याधुनिक सिंचन पद्धती त्याच्या जोडीला फर्टिगेशन आणि काढणी पश्चात उत्तम तंत्रज्ञान अवलंबले तर शेतमालाचे शाश्वत मूल्यवर्धन शंभर टक्के होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर रोपांचे उदाहरण त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी टिश्युकल्चर केळीची रोपे वापरली तर त्यांच्या केळी उत्पादनात दुप्पट वाढ झालीच शिवाय गुणवत्तापूर्ण फळे मिळू लागली. घड व्यवस्थापनासाठी एका घडाला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर पैसे स्कर्टिंग बॅगसाठी लागतात. ती लावली तर किलोमागे कमीतकमी ३ रुपये अधिक किंमत अशा गुणवत्तापूर्ण केळीला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी व नव्या तंत्रज्ञानानुसार शेती करायला हवी असे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

धक्कादायक : 'क्राइम शो' चा नाद अन् सख्ख्या लहान बहिणीकडून मोठीचा चाकूने भोसकून खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2025 !

August 13, 2025

जळगाव : घरातच सुरू केला अवैध गॅस रिफिलिंग सेंटर !

December 14, 2024

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

December 28, 2024

पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group