TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीशभाऊ…सीबीआय अन् गुन्हा दाखल झाल्याची बोंबाबोंब…जाणून घ्या…नेमकं खरं काय ते !

सीबीआय चौकशीची मागणी आम्हीच केली, सत्य उघड होण्याच्या मार्गावर : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in गुन्हे, जळगाव, जळगाव, जामनेर, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) यांच्यावर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतू सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही,अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर दुसरीकडे सीबीआय चौकशीची मागणी आम्हीच केली असून सत्य उघड होण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

याबाबत फडणवीस प्रतिक्रिया देतांना पुढे म्हणाले की, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता, तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राइव्ह दिला होता. त्या पेन ड्राइव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा झाला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आले होते. हे सगळे प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असेल, या सर्व गोष्टींचा पेन ड्राइव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता. आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी महाजनांवर गुन्हा दाखल झाल्याच्या वृताचे खंडन केले आहे. तसेच गिरीश महाजनांवर सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. परंतू अनेक चॅनेल गुन्हा दाखल झाल्याचेच म्हणत आहेत. यामुळे काहीसा संभ्रम आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

सूडाचे राजकारण केले जात असल्याचा महाजन यांचा होता आरोप

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे संचालक विजय पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २७ जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपले अपहरण करून राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांच्याविरोधात सूडाचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. अगदी काही दिवसांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून याबाबतचा मोठा स्फोट तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

स्टिंग ऑपरेशन प्रकरणी महाजन यांनी केली होती चौकशीची मागणी

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांची तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दाखवलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी चव्हाण यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार अर्ज सीआयडीकडे दिला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतू त्यानंतर हे प्रकरण नुकतेच सीबीआयकडे वर्ग झाले होते.

सीबीआय चौकशीची मागणी मीच केलीय, सत्य उघड होण्याच्या मार्गावर : गिरीश महाजन

काही जण मुद्दाम माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची अफवा पसरवत आहेत. परंतू राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत खुलासा करून विरोधकांना तोंडघशी पाडले आहे. मुळात सीबीआय चौकशीची मागणी मीच केली आहे. अगदी सत्य उघड होण्याच्या मार्गावर असून लवकरच माझ्याविरुद्धचा षडयंत्राचा भांडाफोड होणार आहे. काही जण नको त्या चर्चा करून असुरी आनंद घेताय. परंतू पुन्हा सांगतो षड्यंत्र उघड होणार असून सत्य उघड होण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली होती. मात्र, कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, “गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या”, अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटले होते. परंतू महाजन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत चौकशीची मागणी केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

Horoscope Today: Wednesday, 28 September 2022 : आजचं राशीभविष्य, बुधवार २८ सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्षत्रिय मराठा परिवाराच्या दक्षता समितीच्या प्रमुखपदी सुनील शेवाळे

June 30, 2021

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ !

February 11, 2022

अर्णब गोस्वामीला मोबाईल फोन पुरविणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित !

November 11, 2020

मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : हरीभाऊ राठोड

February 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group