TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेशन माफियांसाठी खुशखबर ; माल पकडल्यावर ‘रावेर पॅटर्न’ वापरा, होणार नाही कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) रावेर पोलिसांनी १५ मार्च रोजी भोकरी फाट्यावर एका व्यापाऱ्याकडे रेशनचा माल असलेल्या संशयित वाहन पकडले होते. परंतू याप्रकरणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करून देखील कारवाई होत नाहीय. त्यामुळे ही बाब रेशन माफियांसाठी खुशखबर असून माल पकडल्यावर ‘रावेर पॅटर्न’ वापरल्यास होणार नाही कारवाई, असा संदेश जात असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

रावेर तालुक्यात सध्या गाजत असलेला रेशनचा गहू आणि तांदूळ प्रकरणाची कारवाई पोलिस प्रशासनाने केली होती. रावेर पोलिसांनी १५ मार्च रोजी भोकरी फाट्यावर एका व्यापाऱ्याकडे रेशनचा माल असलेल्या संशयित वाहन पकडले होते. त्यादिवशी पोलीस कार्यालयामार्फत तहसील कार्यालयाला सदरील माल हा रेशनचा आहे किंवा कसा याची तपासणी करण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले होते. या कार्यालयाने घटनास्थळावर जाऊन फक्त धान्याचे नमुने घेऊन जळगाव येथे तपासणीसाठी पाठवले होते.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

यानंतर रेशनचे सील गोडावून अहवाल येण्यापूर्वीच व्यापाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे माहीती अधिकार कार्यकर्ते तथा तक्रारदार दिनेश भोळे यांनी पोलीस निरीक्षक, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, तलाठी कोतवाल आणि होमगार्ड यांनी योग्य कारवाई केली नसल्याने कारवाई न करताच सिल केलेले गोडाऊन व्यापाऱ्यांच्या ताब्यात देऊन मोठ्या रकमेची देवाण-घेवाण झाल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

या प्रकारात देवाणघेवाणीतून प्रकरण मिटवले जात असल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे रावेर येथील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर रावेर पोलिसांनी महसूल विभागाकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तहसीलदार करतील आमच्या कार्यालयाकडे कोणताही पत्रव्यवहार प्राप्त झालेला नसल्याचे म्हटले होते.

थोडक्यात माल सापडला पण कारवाई कोणतीच होत नाहीय. महसूल आणि पोलीस प्रशासन एकमेकाकडे टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे रेशनचा काळाबाजार करणारे निर्धास्त होतील. अगदी जिल्ह्यातील रेशन माफियांसाठी खुशखबर असून माल पकडल्यावर ‘रावेर पॅटर्न’ वापरल्यावर कारवाई होणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

मलकापूर येथील व्यापाऱ्याची साडेचार लाखात फसवणूक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांची लूट थांबवा ; खतसाठा वाढवण्याची रोहित निकमांची पणन मंत्री रावल यांच्याकडे मागणी !

April 18, 2025

जिल्हा बँक निवडणूक : जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही ; काँग्रेसने फेरले सर्वपक्षीय पॅनलवर पाणी !

October 13, 2021

धरणगाव-चोपडा रोडवर अपघात ; चार बहिणींचा एकुलता एक भाऊ ठार !

August 28, 2022

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group