TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर : मागेल त्याला मिळणार विहीर आणि शेततळे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांची घोषणा !

मोदी आवास योजनेतून सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घरकुल !

vijay waghmare by vijay waghmare
August 15, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) अवर्षणप्रवण चाळीसगाव तालुक्याने मागील वर्षी मोठ्या दुष्काळाचा सामना केला, मात्र अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडून ३०० कोटींहून जास्त अनुदान, पीकविमा व दुष्काळी उपाययोजना निधी मिळवून देत शेतकऱ्यांना आधार दिला. त्यामुळे तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शेतीला पाण्याचा हक्काचा स्त्रोत मिळावा यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला १०० टक्के अनुदानावर विहीर व शेततळे देण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली. ते पंचायत समिती चाळीसगाव द्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित रोजगार हमी व मोदी आवास योजना आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी सभापती संजय भास्कराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी जि प सदस्य किशोर पाटील, माजी नगरसेवक, आनंद खरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बाविस्कर, शैलेंद्रसिंग पाटील, प्रदीप पाटील, काकासाहेब माळी, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, धनंजय मांडोळे, बबन पवार, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नितीन चौधरी, अतुल पाटील, यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, विकासो संचालक, शेतकरी, पंचायत समिती व रोजगार हमी योजना विभागाचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

आमदार मंगेशदादा यांनी मनोगतात सांगितले कि, राज्य शासनाने विहिरीसाठी ५ लक्ष तर शेततळे साठी ७ लक्ष असे भरघोस अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेत सर्वांनी येत्या २५ तारखेपर्यंत आपला प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतीकडे जमा करावे, प्रकरण मंजूर करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी कुणालाही एक रुपया देऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मोदी आवास योजनेतून तालुक्यातील उर्वरित ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव जमा करून त्याला मंजुरी द्यावी अश्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून रोजगार हमी योजना व आवास योजनेचा आढावा सर्वांसमोर मांडला. मागेल त्याला विहिरी व शेततळे याची अमलबजावणी करण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतीने लेबर बजेट तयार करावे व त्याला मंजुरी देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. डार्क झोन असणाऱ्या गावात सामुहिक विहीरी देण्यात येतील अशी माहिती दिली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonGood news for the farmers of Chalisgaon taluka: He will get a well and a farm if he asks for itMLA Mangeshdada Chavan's announcement!

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
Next Post

पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आणि गुलाबराव वाघ यांच्या प्रयत्नांनी धरणगावात लसीकरण

December 11, 2021

दहा हजार रुपयांची लाच भोवली ; दोन शिक्षक एसीबीच्या जाळ्यात !

May 12, 2024

धक्कादायक : बेड अभावी संशयित कोरोना रुग्णाला काढले रुग्णालयाबाहेर ! (व्हिडीओ)

September 13, 2020

नवऱ्याचा खून करून बायकोने रचला भलताच बनाव ; शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group