धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्यची महती वर्णन करून राजेंना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी शिवरायांच्या इतिहास सांगतांना सांगितले की, छत्रपती म्हणजे अखंड ऊर्जास्रोत आहेत. छत्रपतींच्या जीवन कार्यातून एक जरी गुण आपण अंगिकारला तरी सुद्धा आपण जगातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. “राज्य छोटं का असेना, पण स्वतःच असावं” हा विचार म्हणजेच छत्रपती शिवरायांचे “स्वराज्य” होय, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, दामिनी पगरिया, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, हर्षाली पूरभे, अमोल सोनार, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे शिक्षकवर्ग यांच्यासह इयत्ता १ ली ते ८ वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.