TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न; विभागनिहाय कामांचा घेतला आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरीता प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागपमुख उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीजेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जावे. याकरीता पोलीस व तुरुंग विभागास १ कोटी ५३ लाख रुपयांची तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामधून पोलीस विभागास २० नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता क्रीडांगण विकास कार्यक्रमांतून शाळांमध्ये मैदाने तयार करावीत. तरुणांना व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, याकरीता गावांमधील व्यायामशाळांना चांगल्या दर्जाचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करुन द्यावे. तसेच नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी व साधनसामुग्री उपलब्ध राहील याकरीता प्रस्ताव सादर करावेत. शेतीला पुरेशी वीज उपलब्ध होईल याकरीता आवश्यक ती सामुग्रीचेही प्रस्ताव सादर करावेत. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण करण्यात यावे. दलीतवस्तीत अभ्यासिका उभारण्याबरोबरच नागरी सुविधांचा विकास व पर्यटनस्थळांच्या विकासाला प्राधान्य द्यावे याकरीता यावर्षी भरीव तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव सादर करावे. विभागामार्फत होणारे काम निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या मागील वर्षातील प्रलंबित कामांचाही आढावा घेऊन सदरची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यात.

सर्व संबधित विभागांनी कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, अपूर्ण कामे वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करतानाच यावर्षी कामांची निवड करतांना विकासात्मक कामांची निवड करण्याची सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली.

जिल्हा वार्षिक योजनेतून शासनाच्या निर्देशानुसार आतापर्यंत कोविडच्या उपाययोजनांसाठी ६१.८७ कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असून ४८.४४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर २६.७० कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर सन २०२०-२०२१ मध्ये जिल्ह्याला सर्वसाधारण, अनुसुचित जाती, जमाती उपयोजनांसाठी ५१३ कोटी ४३ लाख रुपयांचा नियतव्यव मंजूर असून अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यास याप्रमाणे निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर ५०.२६ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरीत करण्यात आला असून ४१.१८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-१९ जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉम्ब ; ऑडिओ क्लिप केली जाहीर !

January 2, 2022

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २५ ऑक्टोबर २०२२ !

October 25, 2022

अत्तरदे फाऊंडेशनच्या मदतीने बायपॅप व ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण

September 4, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group