TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

चहार्डीत वीज कोसळली ; मेंढपाळाचा मुलगा जखमी, ९ बकऱ्या दगावल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2023
in कृषी, चोपडा, जळगाव, जामनेर, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी २० ते २२ मिनिटे गारपीट झाली. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे दोघांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे वीज पडून ९ बकऱ्या दगावल्या.

फत्तेपुरसह परिसरात पडली लिंबाच्या आकाराची गार !
जामनेर तालुक्यातील फत्तेपूरसह परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार गारपीट झाली. लिंबूच्या आकाराच्या गारीमुळे फळबागा, केळीसह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे केळी, मका या पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या महिन्याभरात जामनेर तालुक्यात पाच वेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गारपीट झाली. गुरुवारी फत्तेपुरसह परिसरात लिंबाच्या आकाराची गार पडली. त्यामुळे केळी, आंबा, मका, ज्वारी, बाजरी अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागातर्फे पंचनामे केले जात असून योग्य ती भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

READ ALSO

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

चोपडा तालुक्यात चक्रीवादळ !
चोपडा शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेदरम्यान मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, लहान विक्रेते, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच धावपळ उडाली होती. बाजार समितीमध्ये आलेला माल, अनेक जिनिंगमध्ये पडलेला कापूस, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील गरताड, कुरवेल, तावसे, संपुला, कठोरा, गोरगावले आदी परिसरात चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

चहार्डीत मेंढपाळाचा मुलगा जखमी !
चोपडा तालुक्यातील चहार्डी शेतशिवारात वीज पडून चहाडी गावात मेंढी चारण्यासाठी आलेल्या दादा भीला कलमुडे (रा. घाणेगाव) यांच्या मालकीच्या एकूण ९ मेंढ्यांचा मृत्यू झाला. तर मेंढपाळाचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चहार्डी येथील दूध डेअरीचे चेअरमन जगदीश निंबा पाटील यांची कांद्याची चाळ शेतातून उडून गेल्याने त्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले.

जळगावात दोघे ठार !
तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेत भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा. चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर या घटनेत अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा जखमी झालाय.

भुसावळात दुसऱ्या दिवशीही गारपीट

भुसावळ शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासात ८ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसासोबत बोराच्या आकाराची गारपीट होती. आमोदा ते बामणोद रस्त्यावर वादळामुळे २० झाडे उन्मळून पडल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वांजोळ्यात झाड कोसळून दोन बैल जखमी झाले.

शेतात बैलजोडीवर झाड कोसळून दोन बैल जखमी
वांजोळा, साकेगाव, चोरवड, खडका, किन्ही या भागात दहा मिनिटे गारपीट झाली. तर भुसावळ शहरात ४० मिनिटे पाऊस झाला. वांजोळा येथे दिनकर रामा गिरनारे यांच्या शेतात बैलजोडीवर झाड कोसळून दोन बैल जखमी झाले. साकेगावला काही घरांची पत्रे उडून गेली. वादळामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. भुसावळातील भोईनगर परिसरातही गुरुवारी दुपारपासून खंडित झालेला विजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरु झालेला नव्हता.

यावलला पाऊस,फैजपूर परिसराला गारपिट !

यावल तालुक्यात गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. फैजपूरजवळील साखर कारखाना परिसरात गारपीट झाली. यामुळे केळीसह परिसरातील आंबा, जांभूळ, पपई आदी फळबाग तसेच केळी पिकाला फटका बसला आहे. आमोदा परिसरातही गुरुवारी दुपारी ३ वाजेदरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
Next Post

जेवणासाठी निघाले पण दुचाकीवरच पोलिस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २७ एप्रिल २०२२ !

April 27, 2022

अमानवीय : मांत्रिकाने सांगितले सहाव्यांदाही मुलगीच होणार ; गर्भपातास नकार देणाऱ्या पत्नीचे पोटच फाडले !

September 21, 2020

बर्ड फ्ल्यू : मुंबईत ९ कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ; नागरिक चिंतेत !

January 11, 2021

जळगावातील गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई !

December 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group