TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनर किलिंग : धक्कादायक माहिती आली समोर, शीर धडापासून वेगळं करण्यात आलेली विवाहित तरुणी होती दोन महिन्याची गर्भवती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केली आहे. आई-वडील आणि कुटुंबीयांच्या विरोधात जात या तरुणीनं प्रियकराबरोबर पळून जात विवाह केला होता. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आलेली तरुणी ही दोन महिन्यांची गर्भवती होती. याबाबत कल्पना असतानाही कशाचाही विचार न करता तिची अत्यंत निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

मृत कीर्ती उर्फ किशोरी मोटे ही तरुणी आणि अविनाश थोरे हे दोघंही गोयगाव येथीलच होते. अंदाजे अवघी ५०० लोकसंख्या असलेलं हे गाव. अविनाश हा गावापासून अंदाजे २-३ किलोमीटर अंतरावरच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर राहत होता. किशोरी आणि अविनाश हे शिकायला एकाच महाविद्यालयात होते. महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. मात्र किशोरीच्या कुटुंबीयांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता. या नात्याला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण हे सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये असलेली तफावत हे होतं, असं स्थानिक पत्रकार प्रशांत त्रिभुवन यांनी सांगितलं.

READ ALSO

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

यामुळंच कुटुंबीयांना या दोघांच्या नात्याला विरोध केला. मात्र अविशा आणि किशोरी यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं, त्यामुळं कुटुंबाच्या विरोध मोडून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मोटे कुटुंबाच्या विरोधानंतरही किशोरी आणि अविनाश यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारी घटना घडली त्याच्या आठ दिवसांपूर्वी मृत किशोरी यांच्या आई शोभा मोटे या त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मुलीला भेटून चहा-पाणी घेऊन त्या गेल्या होत्या. आईने मुलीची भेट घेतल्यानंतर अंदाजे आठवडाभरानं म्हणजे सोमवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी मुलीची आई शोभा आणि भाऊ म्हणजे संजय मोटे हे दोघं पुन्हा एकदा लाडगाव शिवारातील तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले. त्यांना पाणी वगैरे देऊन किशोरी चहा करत होत्या, त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजे आई आणि भावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केली. धारदार शस्त्रानं संजय मोटे यांनी किशोरी यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं. या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे पाय धरून ठेवले होते, असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.

धडावेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्याठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्याठिकाणाहून निघून गेले. शीर अंगणात ठेवल्यानंतर संजय आणि शोभा हे दोघं काही अंतरावर असलेल्या बाईकवरून त्याठिकाणाहून निघून गेले. ते दोघं स्वतः पोलिस ठाण्यात गेले अशीही माहिती मिळाली आहे. मृत किशोरी या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्या आई शोभा मोटे यांना याबाबत माहितीही होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र हे माहिती असूनही तरीही कशाचाही विचार न करता अत्यंत निर्घृणपणे या दोघांनी त्यांची हत्या केली.

आईचाही या घटनेत समावेश असल्यानंही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा यांनी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. “या घटनेत आपल्या मुलाचा सहभाग आहे, वंशाचा दिवा आहे त्यामुळं इच्छा असो वा नसो मुलाबरोबर जाणं ही आईची अपरिहार्यता असू शकते,” असं याबाबचं त्यांचं वैयक्तिक विश्लेषण असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंधी कॉलनी युवतीच्या आत्महत्याप्रकरणी झिरो पोलीस विरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2021

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक बंगल्यात १०१ रोपांची लागवड !

August 20, 2021

‘मविआ’तील एकाची विकेट पडणार : चंद्रकांत पाटील

June 18, 2022

मंत्रालयाचा धाक दाखवून कार्यकारी अभियंत्यांकडून ठेकेदारांची आर्थिक लुट ; कंत्राटदार संघटनेची तक्रार

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group