TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मी पक्का माणूस, कुठल्याही भीती किंवा दडपणाला बळी पडणार नाही’ : खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे काम चाललंय. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. पण मी पक्का माणूस आहे. कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय.

खडसे म्हणाले की, मुक्ताईनगर मतदारसंघात मी गेल्या ४० वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. हे करत असताना केवळ मुक्ताईनगर नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज मी कोणत्याही पदावर नसलो तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अलीकडे मी पाहतो आहे. ईडी चौकशी असेल किंवा अन्य प्रकारे माझी जी छळवणूक चाललेली आहे, मला त्रास देण्याचे काम चालू आहे. ते चुकीचे आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये ४० वर्षांत माझ्यावर एकही आक्षेप माझ्यावर नव्हता. असे असताना आता अशा प्रकारे अचानक वादळ उठणे, मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणे, नाथाभाऊ एक भ्रष्टाचारी माणूस आहे, अशा प्रकारची प्रतिमा जनमानसात उभी करण्याचे काम चालले आहे. हे काम माझे हितचिंतकच करत आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे. कुठल्याही भीतीला किंवा दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही चूक केलेली नाही. या सर्व प्रकरणातून मी जनतेच्या आशीर्वादामुळे निश्चितच बाहेर पडेन’, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीमुळे राज्य सरकारला अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच व्यक्त केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी खडसेंना विचारणा केली असता ते म्हणाले, आपल्या पक्षाचे सरकार असताना सुधीर मुनगंटीवार यांनी कधी खर्चाचा हिशोब काढला नाही. दुसऱ्या पक्षाचे सरकार आले की मात्र, लगेच खर्चाचा हिशेब काढायचा. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७० वर्षे झाली. महाराष्ट्राची निर्मिती होऊन जवळपास ६० वर्षे झाली. या काळात राज्यपाल नियुक्त१२ आमदारांची नियुक्ती करण्यात आलेले आहे. अगदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होते, त्यावेळीही नियुक्ती झालेली आहे. सेना-भाजपचे सरकार होते त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी कधी असा विरोध केला नव्हता. आपले सरकार असताना विरोध करायचा नाही. बाकी दुसऱ्याचे सरकार आले की विरोध करायचा, मुनगंटीवार यांच्याकडून तरी ही अपेक्षा नाही, असा टोला खडसे यांनी लावला.

आपल्या वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताई चरणी जळगाव जिल्ह्याच्या विकासाचे साकडे घातले. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जिल्ह्यात शांतता व सुबत्ता नांदावी, अशी आपण आजच्या दिवशी मुक्ताईला प्रार्थना करत असल्याचेही खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

मला थोडासा वेळ द्या ; राष्ट्रपतींचं संभाजीराजेंना आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड बाजार समितीवरील आरोप समितीची बदनामी करणारे : सभापती सुधीर तराळ !

March 3, 2024

धरणगावचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व मनोरुग्ण बांधवांना स्नेहभोजन !

February 15, 2025

महिलेला अश्लिल फोटो व मँसेज पाठवून विनयभंग ; वरणगाव पोलिसात जळगावच्या एकाविरुद्ध गुन्हा !

May 7, 2022

हॉटेलमध्ये बेकायदा मद्य विक्री व पिणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा !

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group