TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती ; आमदार देवेंद्र भुयार संतापले

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. त्यानंतर भुयार चांगलेच संतापले असून आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करणार आहेत. मी महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, असं ते म्हणाले.

काल संजय राऊत यांनी ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला, तेच देवेंद्र भुयार अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना भुयार म्हणाले, ‘मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचा मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिलं. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या तर त्या प्रमाणे मतदान केलं’ असल्याचं स्पष्टीकरण देखील भुयार यांनी दिलं.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

तसंच हे सर्व आपण पवारांना भेटून सांगणार आहे. प्रामाणिकपणे मतदान करूनही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल, हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.

तसंच मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत, अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाहीत. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का असा सवाल करत मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचे आभार ; संभाजीराजे समर्थकांची सेना भवनासमोर बॅनरबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेडी शिवारातील विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या !

July 5, 2021

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 7 मे 2025 !

May 7, 2025

सासू-सासऱ्यांना काढले घराबाहेर ; पोलिसात तक्रार

December 23, 2021

उभ्या कारला ट्रकची धडक, एकाच परिवारातील आठ जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

July 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group